B T Deshmukh : माजी आमदार बी. टी. देशमुखांचे निधन, तब्बल 30 वर्ष केले होते प्रतिनिधीत्व

B T Deshmukh Ex Mla : माजी आमदार बी टी देशमुख यांचे हृदयविकाराने आज निधन झाले. तब्बल 30 वर्ष ते विधीमंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत राहिले होते.
B T Deshmukh Passes Away
B T Deshmukh Passes Awaysarkarnama
Published on
Updated on

B T Deshmukh News : सिंचन अनुशेषाचे जनक माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातील सिंचनावरील लढाईला धक्का पोहोचण्यासोबतच प्राध्यापक, शिक्षक संघटनांचे अपरिमित नुकसान झाले आहे.

प्रा. भाऊसाहेब तुळशीराम देशमुख विधानपरिषदेत तब्बल पाचवेळा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते. सन १९८० ते २०१० असे तीस वर्षे त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

नुटा, एम फुक्टो, आयफुक्टो या संघटनांचे ते अध्यक्ष होते.विधान मंडळाच्या विविध समितीवरही त्यांनी प्रतिनिधीत्व केले असून आश्वासन समितीचे ते अध्यक्षही राहले आहेत. सन १९९६ ला त्यांना राष्ट्रकूल संसद परिषदेचा पहिल्या संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिंचन निर्मुलन अनुशेष समितीचे ते प्रमुख पदाधिकारी राहिले असून या समितीत विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व डॉ. सुनील देशमुख यांचाही समावेश होता. या लढाईचे ते जनक म्हणूनच राज्यभरात प्रसिद्ध होते.

अमरावती शहरासह ग्रामीण भागतील पाणी पुरवठा योजना अमलात आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. विशेषतः अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठ्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नानेच आज या शहराला मुबलक पाणी मिळत आहे.

प्रा. बी. टी देशमुख यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.२०) येथील हिंदू स्मशान भूमीत सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली वैशाली वानखडे व डॉ. दीपा लाड व आप्तपरिवार आहे.

नुटा बुलेटिनला ५० वर्षे

प्रा. बी. टी. देशमुख यांनी सुरु केलेल्या नुटा बुलेटीनला ५० वर्षे झाली आहेत. या बुलेटिनच्या माध्यमातून प्राध्यापक व शिक्षकांचे प्रश्न अतीशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासोबतच शासनाकडून जारी करण्यात येणारे शासनआदेश तसेच त्याबाबतची चिकीत्सा करण्यात येते. आजही हे बुलेटिन सुरु आहे. त्यांच्या निधनाने २१ जुनला होणारा नुटाचा ५० वा वर्धापन दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com