घरभेद्यांमुळे माझा पराभव! माजी आमदार बाजोरियांचे शिवसेनेतील नेत्यांकडेच बोट

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाला होता.
Gopikishan Bajoria
Gopikishan BajoriaSarkarnama
Published on
Updated on

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात घरभेदींमुळे पराभव झाला, असा खळबळजनक दावा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांनी केला आहे. या प्रकरणाची खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दखल घेतली असून, लवकरच पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या शिवसेना (Shivsena) नेत्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाही बाजोरिया यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाल्यानंतर चौथ्या वेळेस बाजोरिया यांना भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर एका महिन्याने बाजोरिया यांनी अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील स्वपक्षीयांवर निशाणा साधला. शिवसेनेतील काही लोकांनी माझ्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा आरोप बाजोरिया यांनी केला आहे.

Gopikishan Bajoria
अखिलेश यांच्यानंतर जयंत चौधरींची फोडाफोडीत आघाडी..भाजपसह काँग्रेसला दे धक्का!

या पराभवाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. महिनाभरानंतर स्वपक्षीयांवर बाजोरिया यांनी पराभवाचे खापर फोडून पक्षात खळबळ उडवून दिली आहे. त्यांचा रोख नेमका कोणावर आहे हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. माझ्या पराभवासाठी प्रयत्न केले त्यांची नावे मुख्यमंत्र्यांकडे गेली असून, यासंदर्भात खासदार अरविंद सावंत यांच्याशी चर्चा केली असल्याचे बाजोरिया यांनी सांगितले.

Gopikishan Bajoria
उत्तर प्रदेशात 20 जानेवारीपर्यंत दररोज भाजपचा 1 मंत्री अन् 3-4 आमदार राजीनामा देणार!

अकोला जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचे दोन गट सक्रिय झाले आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बाजोरिया यांच्या आरोपांनी आजी-माजी आमदारांमधील मतभेद आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील गटबाजी आणि विधान परिषदेला बाजोरिया यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला फिरणारे शिवसैनिक सध्या गायब झाले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपामुळे ते पक्षात आता एकाकी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com