Yavatmal Crime News: धक्कादायक! शेतजमिनीचा वाद पेटला; माजी आमदाराची फॉर्च्युनर गाडी कुऱ्हाडीने फोडली

Yawatmal News : सचिन भिमराव पंचरे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची तब्बल 14 एकर शेती वार्षिक सत्तर हजार रुपये दरानं 3 वर्षांसाठी ठेक्यानं घेतली.यासंबंधीच्या कराराची पावतीही आहे.यानंतर ते पेरणीसाठी मालकाच्या फॉर्च्युनर गाडीसह शेतीच्या ठिकाणी गेले होते.
Yawatmal Crime News .jpg
Yawatmal Crime News .jpgSarkarnama
Published on
Updated on

Yawatmal News: गेल्या काही दिवसांतील गुन्हेगारीच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरलं आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे गृहविभाग,पोलिस यंत्रणा यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या गुन्हेगारीच्या घटनांमुळे महिला,सरकारी कर्मचारी वयोवृध्दांसह नेतेमंडळीही असुरक्षिततेच्या छायेत वावरत आहे. अशातच विदर्भातून (Vidarbha) एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी तालुक्यातील दुर्भा येथे एका माजी आमदाराची महागडी फॉर्च्युनर गाडी कुऱ्हाडीने फोडण्यात आली आहे. शेतीवादावरुन उफाळून आल्यानंतर ही घटना घडली आहे. याप्रकरणी आता पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार वामनराव कासावार यांची फॉर्च्युनर गाडीचं या तोडफोडीत जवळपास 2 लाखांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पेंन्टना गोंटीमुकुलवार, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करण यांचा समावेश आहे.

घटना काय...?

पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार,दुर्भा येथे आरोपी पेंन्टना गोंटीमुकुलवार,त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करण यांनी शेतात पाहणी करण्यासाठी आलेल्या सचिन भिमराव पंचरे (35) यांच्याशी वाद झाला. यावेळी पंचरे हे आपल्या मालकाची (MH29.BP.0505) ही फॉर्च्युनर गाडी घेऊन आले होते.

Yawatmal Crime News .jpg
Prakash Mahajan: नारायण राणेंशी पंगा घेतल्यानंतर आता संजय राऊतांवर 'फायर'; प्रकाश महाजन म्हणाले, 'सुमार कुवतीची माणसं...'

सचिन पंचरे यांच्याशी झालेल्या वादानंतर आरोपींनी माजी आमदाराची फॉर्च्युनर गाडी हातातील कुऱ्हाडीने फोडली. दरम्यान, यावेळी आपल्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारदार पंचरे यांनी केला आहे

नेमकं प्रकरण काय?

सचिन भिमराव पंचरे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची तब्बल 14 एकर शेती वार्षिक सत्तर हजार रुपये दरानं 3 वर्षांसाठी ठेक्यानं घेतली.यासंबंधीच्या कराराची पावतीही आहे.यानंतर ते पेरणीसाठी मालकाच्या फॉर्च्युनर गाडीसह शेतीच्या ठिकाणी गेले होते.

Yawatmal Crime News .jpg
Satej Patil: कोल्हापुरात लवकरच राजकीय भूकंप? 'एकटा पडलोय' म्हणणाऱ्या सतेज पाटलांबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले...

त्याचवेळी तेथे गावातील रहिवासी पेंन्टना गोंटीमुकुलवार,आपल्या पत्नी आणि मुलासह दाखल झाले. त्यांनी संबंधित शेतजमि आपला दावा करतानाच पेरणी थांबवण्याचा प्रयत्न केला.यावेळी, पंचरे यांनी जिल्हा परिषद शाळेसोबत झालेल्या कराराची माहिती दिली.पण आरोपींनी पंचरे यांच्याशी वाद घालणं सुरुच ठेवलं.अखेर या वादातूनच फॉर्च्युनर गाडी फोडण्यात आली.

वणी विधानसभा मतदारसंघातून वामनराव कासावार हे 1990-1999 आणि 2009 च्या विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेत निवडून गेले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. यवतमाळ जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या कासावार यांनी 2016 मध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com