Vasntrao Maldhure Paased Away : माजी शिक्षक आमदार वसंतराव मालधुरे यांचे निधन

Teacher MLA : अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार वसंतराव मालधुरे (वय ७३) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Vasntrao Maldhure
Vasntrao MaldhureSarkarnama

Amravti News : अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार वसंतराव मालधुरे (वय ७३) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मालधुरे यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषदेचे ग्रामीण भागातील शाखा कार्यवाहपासून सरकार्यवाहपदापर्यंत कार्य केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, अमरावती नगरवाचनालयाचे संचालक व अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. (Vasntrao Maldhure Paased Away News)

Vasntrao Maldhure
Girish Mahajan Vs Sanjay Raut News : गिरीश महाजन राऊतांवर बरसले; म्हणाले, त्यांचे डोकं तपासा...

वसंतराव मालधुरे (Vasntrao Maldhure) यांना परिषदेने 1990 मध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण केले. यानंतर शिक्षक परिषद राज्यस्तरावर नेण्यासाठी दिवाकर जोशी यांच्यासोबत कार्य केले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाचे महामंत्री म्हणूनही काही काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, अमरावती नगरवाचनालयाचे संचालक व अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषदेचे ग्रामीण भागातील शाखा कार्यवाह ते सरकार्यवाह पदापर्यंतचा वसंतराव मालधुरे यांचा प्रवास शिक्षक परिषदेचा राज्यस्तरावर विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण ठरला. या जबाबदारीतून शिक्षकांच्या सामूहिक व वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत ट्विटरवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली.

Vasntrao Maldhure
Sambhajinagar Lok Sabha Constituency : काठावर पास झालेले आमदार सावे, जयस्वाल लोकसभेला मताधिक्य कसे मिळवून देणार?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com