Gondia District APMC Analysis : गोंदियात डॉ. परिणय फुकेंनी पटेलांच्या साथीने नाना पटोलेंना दिली मात !

Gondia District Bazar Samiti: सहाही बाजार समित्यांवर भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता काबीज केली.
Prafull Patel, Dr. Parinay Fuke and Nana Patole
Prafull Patel, Dr. Parinay Fuke and Nana PatoleSarkarnama

Gondia District APMC Elections Results Analysis : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये गोंदिया जिल्ह्यात कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने युती केली. ही युती यशस्वीही झाली. केवळ गोंदिया बाजार समितीमध्ये कॉंग्रेस अपक्ष आमदार विनोद अग्रवाल (चाबी) यांच्यासोबत युती करून सत्ता मिळवली. तर उर्वरित सहाही बाजार समित्यांवर भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता काबीज केली. (BJP along with NCP captured power on the six market committees)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके या दोघांचेही उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे नाना पटोलेंचा पराभव. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकींमध्ये हे दोन नेते एकत्र आले आणि भाजप-राष्ट्रवादी अशी युती झाली. या युतीने सहा बाजार समित्यांवर विजय मिळवला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांनी धुरा सांभाळली. भाजप-राष्ट्रवादी यापूर्वी हा प्रयोग जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्येही यशस्वी केलेला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना विजयाची खात्री होती. हाच प्रयोग डॉ. परिणय फुके यांनी भंडारा जिल्ह्यात राबवून नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या साकोली-लाखनी बाजार समितीमध्ये नानांना मात दिली आहे. (Political Web Stories)

गोंदियात सात बाजार समित्यांपैकी देवरी बाजार समिती भाजपने सुरूवातीलाच बिनविरोध निवडून आणली. यापूर्वी ही बाजार समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होती. गोंदिया अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या साथीने कॉंग्रेसने सत्ता मिळवली. उर्वरित आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी या बाजार समित्यांवर भाजप-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. यांमध्ये ज्या बाजार समित्या पूर्वी राष्ट्रवादीकडे होत्या तेथे भाजप त्यांच्यासोबत सहभागी झाली आहे.

Prafull Patel, Dr. Parinay Fuke and Nana Patole
Washim District APMC Analysis : भाजपने देशमुखांमुळे राखले रिसोड, बाकी सर्वत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच !

दोन महिन्यांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हाच राजकीय गणिते बदलतील, असा कयास लावला जात होता. कारण त्या कार्यक्रमापूर्वीच भाजपने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत घरोबा केला होता आणि स्थानिक राजकारणाची दिशा बदलवून टाकली होती.

बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये डॉ. परिणय फुके यांनी सुरुवातीपासून राष्ट्रवादीशी जवळीक केली होती. त्यांची ही खेळी यशस्वी ठरली आहे. राष्ट्रवादीच्या साथीने त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील बाजार समित्यांवर आपला झेंडा फडकावला आहे. या निवडणुकांचा विधानसभेच्या निवडणुकांशी काहीही संबंध नसतो, असे कितीही सांगितले जात असले तरी तो असतोच. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते या निवडणुकांवर लक्ष ठेवून असतात. नव्हे तर प्रत्यक्ष प्रचारातही उतरतात.

Prafull Patel, Dr. Parinay Fuke and Nana Patole
Wardha District APMC Analysis : वर्धा जिल्यात बाजार समिती भाजपच्या आवाक्यापासून दूरच !

गोंदिया जिल्ह्यातही बाजार समितीच्या निवडणुकांनी चांगलीच रंगत आणली होती. सर्व आमदार या निवडणुकांमध्ये सहभागी झाले होते. तिरोडा आणि गोरेगाव हा भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा गड आहे. येथे त्यांनी मोठा विजय मिळवला आहे. गोरेगावमध्ये कॉंग्रेसमध्ये नाना पटोलेंपासून नाराज असलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले आणि गोरेगाव बाजार समिती आपल्याकडे कायम राखली.

हाच फॉर्म्यूला आगामी निवडणुकांमध्ये भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसने कायम ठेवल्यास कॉंग्रेसला जड जाणार आहे. भाजप हा नाना पटोलेंच्या विरोधी पक्ष आहेच. पण राज्यात सोबत असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्षदेखील जिल्ह्यात नाना पटोलेंसोबत नाही. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत नाना पटोलेंचे कधी जमलेच नाही. (Political Short Videos)

Prafull Patel, Dr. Parinay Fuke and Nana Patole
Darwha - Arni APMC Result: दारव्ह्यात संजय राठोड, तर आर्णीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व !

राज्यात कितीही जवळीक असली तरी (Bhandara) भंडारा-गोंदिया (Gondia) या जिल्ह्यांमध्ये हे दोन नेते एकत्र येण्याची कुठलीही शक्यता नाही. नेमकी हीच बाब हेरून डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला जवळ केले आणि त्याच्या यशाची फळेही ते चाखत आहेत. त्यामुळेच हा फॉर्म्यूला कायम राहिल्यास भाजप (BJP) येथे यशाची फळे चाखणार, हे निश्‍चित.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com