Dharmarao Baba Atram News : प्रफुल्ल पटेलांच्या गोंदियासाठी धर्मरावबाबा आत्राम यांना वेळ मिळेना...

Gondia Guardian Minister News : धर्मरावबाबा आत्राम १८ ऑक्टोबरला गोंदियात येणार होते, पण ऐनवेळी कुठे माशी शिंकली कोण जाणे आणि बाबांचा नियोजित दौरा रद्द झाला.
Dharmarao Baba Atram
Dharmarao Baba AtramSarkarnama

Gondia News : विदर्भातील मागास आणि नक्षलप्रभावित जिल्हा असलेल्या गोंदियाच्या वाट्याला आतापर्यंत उपेक्षाच आली आहे. चालू पंचवार्षिक योजनेत आता सरकारने गडचिरोलीचे धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्रिपद सोपविले आहे; परंतु इतर मंत्र्यांप्रमाणे बाबांनीही केवळ ‘तारीखच’ दिल्याने जिल्हा नियोजन समितीची सभा रद्द करावी लागली आहे. (Gondia got five guardian ministers in four years)

धर्मरावबाबा आत्राम यांना राज्य सरकारकडून गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व देऊन जवळपास २२ दिवसांचा कालावधी झाला आहे. सुमारे तीन आठवड्यांनंतरही बाबा गोंदियाकडे फिरकलेले नाहीत. इतकेच काय तर त्यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रेही स्वीकारलेली नाहीत. ता. १८ ऑक्टोबरला बाबा प्रथमच गोंदियात येणार होते, पण ऐनवेळी कुठे माशी शिंकली कोण जाणे आणि बाबांचा नियोजित दौरा रद्द झाला. बाबा येणार असल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात येणार होती. मात्र, पालकमंत्रीच न आल्याने ही बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dharmarao Baba Atram
Operation Lotus in Maharashtra : महाराष्ट्रात भाजप खासदारांची संख्या घटणार : तावडे समितीच्या अहवालानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’

भंडाराप्रमाणे गोंदिया जिल्ह्याचे नशीबही पालकमंत्र्यांबाबत तेवढेसे चांगले नाही. गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच चार वर्षांत पाच पालकमंत्री लाभले आहेत. आतापर्यंत एकाही पालकमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. विकास करणे तर दूरच. आता धर्मरावबाबा आत्राम गोंदियाचे पाचवे पालकमंत्री नियुक्त झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट ज्यावेळी सत्तेत सहभागी झाला, त्यावेळी मंत्रिपदाच्या वाटपात गोंदियाचे पालकमंत्रिपद अजित पवार गटाला मिळावे, अशी प्रफुल्ल पटेल यांची आग्रही मागणी होती. खुद्द धर्मरावबाबा आत्राम यांनीही त्यांची नियुक्ती झाल्यानंतर हीच माहिती दिली होती. परंतु पटेलांच्या गृहजिल्ह्याबाबत बाबा का वेळ काढत नाहीत, हा आता चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचा १८ ऑक्टोबरचा दौरा रद्द झाल्याने आता २६ व २७ ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला आहे. हा मुहूर्त साधला जावा व धर्मरावबाबांचे चरण जिल्ह्याच्या भूमीला लागावे, अशी प्रशासनासह जिल्ह्यातील अनेक राजकीय मंडळींची इच्छा आहे.

Dharmarao Baba Atram
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील प्रकरणी फडणवीसांचा गर्भित इशारा; ‘अजून खूप गोष्टी आहेत, त्या आजच सांगणार नाही’

राज्यातील पालकमंत्र्यांची सुधारित यादी सरकारने प्रसिद्ध केल्यानंतर गोंदियात पुन्हा एकदा बाहेरच्या व्यक्तीला पालकमंत्रिपदी नेमण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. धर्मरावबाबा आत्राम यांच्यापूर्वी या जिल्ह्याची धुरा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होती. त्यावेळीही बाहेरचा पालकमंत्री नेमल्याची ओरड गोंदियात होती.

गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे, अशी सोय त्यांनी करून घेतली. परंतु त्यानंतरही बाबा जिल्हावासीयांना ‘तारीख पे तारीख’ देत असल्याने भविष्यात गोंदियाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dharmarao Baba Atram
Fadnavis Big Announcement : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय; कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com