Gadchiroli Politics : लोकसभा निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. यात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कारणांचा समावेश आहे. पण, भाड्याच्या घरात राहणाऱ्या नेत्यांनी बंगला बांधला आणि पराभवाला सामोरे जावं लागलं, असाच काहीसा योगायोग गडचिरोलीत घडला आहे.
सलग दोनदा खासदार राहिलेल्या अशोक नेते ( Ashok Nete ) यांचा पराभव काँग्रेसचे नामदेव किरसान ( Namdeo Kirsan ) यांनी केला. नेते यांच्या पराभवानंतर या योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे. कारण, अशोक नेते यांच्यापूर्वी आणखी दोन नेत्यांचा अनुभव यापेक्षा वेगळा नाही.
काँग्रेसचे खासदार मातोवराव कोवासे, माजी आमदार नामदेव उसेंडी ( Namdev usendi ) आणि आता अशोक नेते यांना घर बांधलेल्या वर्षीच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
सन 1990 च्या काँग्रेसचे मातोवराव कोवासे यांनी गडचिरोली येथे स्वत:चं घर बांधलं. पण, त्याचवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी मातोवराव कोवासे यांचा पराभव केला.
आमदार असताना नामदेव उसेंडी यांनी गडचिरोली शहरात कॅम्पमध्ये 2019 ला बंगला बांधला. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार उमेदवार अशोक नेते यांनी उसेंडी यांना पराभूत केलं होतं.
यातच यंदाच्या निवडणुकीत हॅटट्रिक करण्याची संधी पाहणाऱ्या अशोक नेते यांचा बंगला निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी बांधला. पण, या निवडणुकीत अशोक नेते यांना नामदेव किरसान यांनी पराभवाची धूळ चारली.
त्यामुळे गडचिरोलीत आमदार आणि खासदारांचा भाड्याच्या घराशी जवळीकता नसेल ना? अशी चर्चा रंगली आहे. त्यासह भाड्याच्या घरात राहत असतानाच मातोवराव कोवासे, अशोक नेते, नामदेव उसेंडी आणि नामदेव किरसान यांना यश मिळालं होतं. कोवासे, नेते, उसेंडी यांनी घर बांधलं आहे. त्यामुळे किरसान नवीन घर बांधतात की भाड्याच्या घरातच राहतात हे पहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.