Gadchiroli Chimur Lok Sabha Constituency : राजकारणाकडे सेवेची संधी म्हणून पाहणारे डॉ. नामदेव किरसान

Lok Sabha Election 2024 : गडचिरोली-चिमूर मतदारसंघात डॉ. नामदेव किरसान की डॉ. नामदेव उसेंडी यापैकी कोणत्या 'नामदेवा'ला पक्ष संधी देईल, अशी चर्चा रंगली आहे.
Namdeo Kirsan
Namdeo Kirsansarkarnama

Lok Sabha Election 2024 :  राजकारण म्हणजे सत्ताकारण हा व्यवस्थेचा दृढ समज झाला आहे. पण, काही व्यक्तिमत्त्व अशी असतात, जे याकडे सेवेची संधी म्हणून बघतात. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर करतात. डॉ. नामदेव किरसान ( Namdeo Kirsan ) हे याच गटात मोडणारे. उच्चशिक्षित असलेले किरसान हे गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. या काळात राजकारणातून उत्तम समाजकारण करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. उच्चपदस्थ नोकरीला राम राम ठोकत त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि गडचिरोली जिल्ह्यातील ( Gadchiroli ) गावागावांत त्यांनी आपल्या कामाच्या आधारे अनेकांची मने जिंकली.

Namdeo Kirsan
Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक जिल्हा परिषदेनंतर आता रश्मी बर्वे यांची दिल्ली गाठण्याची तयारी

महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित असलेले किरसान सध्या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे ( Gadchiroli Chimur Lok Sabha Constituency ) समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. दोन्हीवेळी त्यांनी कमालीचा संयम दाखविला. दुसऱ्या पक्षात न जाता काँग्रेसमध्येच ( congress ) राहून अधिक गतीने आपले काम सुरू ठेवले, जनसंपर्कही वाढविला. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'त त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उच्चशिक्षित व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याची पक्ष या वेळी दखल घेईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. या वेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून त्यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्याला खांदा लावून गडचिरोलीत पक्षवाढीसाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Namdeo Kirsan
Buldhana Lok Sabha Constituency: 'वन मिशन बुलढाणा'च्या बळावर संदीप शेळके नशीब आजमावणार

नाव (Name) :

डॉ. नामदेव दासाराम किरसान

जन्मतारीख ( Birth Date) :

14 जुलै

शिक्षण (Education) :

एमकॉम, एमफिल, एमए, एलएलएम, गांधी विचारधारा व मॅनेजमेंट बिझनेस या दोन विषयांत नागपूर विद्यापीठातून पीएच.डी.

Namdeo Kirsan
Chandrapur Lok Sabha Constituency : पक्षांतर्गत स्पर्धा प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेसच्याही मार्गातील अडसर

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोविंदपूर या अतिदुर्गम, जंगलव्याप्त गावात डॉ. किरसान यांचा जन्म झाला. अतिशय गरीब कुटुंबातून ते समोर आले. वडील दासाराम व आई यशोदाबाई हे सामान्य शेतकरी होते. प्रचंड संघर्ष करून उच्चशिक्षण घेत ते प्राध्यापक झाले. पुढे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त झाले. डॉ. किरसान यांना दोन मुले आहेत. एक मुलगा अमेरिकेत असून, दुसरा मुलगा नागपुरातील उच्च न्यायालयात वकिली करत आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय कोणता? (Service/Business) :

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constiruency) :

गडचिरोली -चिमूर

राजकीय पक्ष कोणता? ( Political Party Affiliation) :

काँग्रेस

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Constesed or political journey) :

डॉ. नामदेव किरसान हे नागपुरातील धनवटे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. याच दरम्यान त्यांनी आमगांव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर कठोर अभ्यास करीत त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. वर्ग एकचे प्रशासकीय अधिकारी झाले. 18 वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानंतर ते सक्रिय राजकारणात दाखल झाले. लहानपणापासून गांधी विचारांचा पगडा असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आपल्या कामाला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाची विचारधारा गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत पोचविण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केला. भाजपच्या विविध धोरणांविरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली. भाजपने आणलेल्या कृषीविषयक तीन कायद्यांना काळे कायदे संबोधत त्यांनी अक्षरशः रान पेटवले होते. गडचिरोलीच्या गावागावांत स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक मोठी अन् तेवढीच आक्रमक आंदोलने केली आहेत.

रोजगारासह आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण, त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यांच्या जागी माजी आमदार नामदेव उसेंडी यांना पक्षाने दोनदा उमेदवारी दिली. मात्र, दोन्ही निवडणुकीत उसेंडी यांचा भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी पराभव केला. पक्षाने उमेदवारी न दिल्याने डॉ. किरसान नाराज झाले नाहीत किंवा त्यांनी पक्ष सोडला नाही. आपले काम त्यांनी प्रामाणिकपणे सुरूच ठेवले. पक्षाने त्यांना प्रदेश सरचिटणीसपद दिले. गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून ते सध्या काम पाहात आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. यावेळेसही गडचिरोली-चिमूर मतदारसंघात डॉ. नामदेव किरसान की डॉ. नामदेव उसेंडी यापैकी कोणत्या 'नामदेवा'ला पक्ष संधी देईल, अशी चर्चा रंगली आहे. नुकताच गडचिरोलीत काँग्रेसचा मेळावा झाला. यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डॉ. नामदेव किरसान यांच्या हातात 'हात' दिला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा फोटो व्हायरल करत डॉ. किरसानच आपले उमेदवार असतील, असा आशावाद व्यक्त केला.

Namdeo Kirsan
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेकडून संधीची संजय राठोड यांना अपेक्षा

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social work in the Constituency) :

डॉ. नामदेव किरसान यांचा मूळ पिंड समाजकारणाचा राहिला आहे. राजकारण करताना त्यांनी समाजाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण, मुबलक व अत्याधुनिक आरोग्य सुविधा, महिला सशक्तीकरण, रोजगार, उद्योग अशा अनेक बाबींवर त्यांनी जिल्ह्यात मोठे काम केले आहे. एकीकडे सूरजागड, कोनसरी प्रकल्प होत असताना या ठिकाणची जल, जमीन, जंगल सुरक्षित राहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

डॉ. नामदेव किरसान यांनी विविध पदयात्रा काढून महत्त्वाचे मुद्दे रेटून धरले. त्यांनी 2019 मध्ये सिरोंचा ते सालेकसा ही जनसंपर्क यात्रा काढली. तब्बल दोन महिने ही यात्रा चालली. या माध्यमातून त्यांनी दीड हजार गावांना भेटी देत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधी यांनी काढलेल्या 'भारत जोडो यात्रे'त त्यांनी अनेक दिवस सक्रिय सहभाग घेतला. आदिवासी समुदायाचे नेतृत्व करताना त्यांनी विविध प्रश्न शासन दरबारी मांडले. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे, हे सांगत त्यांनी अतिदुर्गम भागातील गावागावांत जनजागृती केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार देऊन गौरव केला.

2019 मधील निवडणूक लढवली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Constested 2019 Lok Sabha Election) :

2019 मध्ये डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

निवडणूक लढवली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

गडचिरोली -चिमूर मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. नामदेव किरसान काम करीत आहेत. त्यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत त्यांनी कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे. नामदेव किरसान यांचे वैशिष्ट्य असे की, ते दररोजच रात्रंदिवस मतदारसंघात दौरे करून विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यांच्याकडे प्रभावी नियोजन आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

डॉ. नामदेव किरसान हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजमाध्यमांतील विविध प्रणालींचा वापर करून ते लोकांपर्यंत आपली मते पोहोचवतात. आपल्या दैनंदिन कार्यक्रमांची माहिती देतात. फेसबुक, 'एक्स', व्हॉट्सॲप व इतर माध्यमांचा ते पुरेपूर वापर करतात. बिनधास्तपणे आपली भूमिका मांडतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

डॉ. नामदेव किरसान यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय संयमी आहे. संकटकाळातही त्यांनी संयमाने वक्तव्ये केली आहेत.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/Guru) :

राजकीय गुरूसंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about Candidate) :

डॉ. नामदेव किरसान यांच्या पक्षनिष्ठेबाबत कोणालाही शंका नाही. गावागावांतील लोकांशी त्यांचा थेट संपर्क आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. सामान्य नागरिकांसाठी रात्रंदिवस काम करण्याची त्यांची तयारी असते. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative points about candidate) :

डॉ. नामदेव किरसान यांचा रोखठोक स्वभाव आहे. तक्यामुळे अनेकदा ते अडचणीत येतात.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते? (If didn't get chance to contest Lok sabha election what will be the consequences ) :

गडचिरोली - चिमूर मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा खासदार आहे. या वेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. डॉ. नामदेव किरसान यांची स्वच्छ राजकीय प्रतिमा, कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याची त्यांची पद्धत यामुळे अनेक कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांच्याबरोबर आहे. अशा स्थितीत त्यांना उमेदवारी न दिल्यास पक्षाला मोठा फटका बसू शकतो.

(Edited By - Akshay Sable)

R

Namdeo Kirsan
Ramtek Lok Sabha Constituency : किशोर गजभिये यांना यंदा तरी दिल्लीवारीची संधी मिळेल का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com