Girish Bapat News : प्रतिकूल काळात पुण्यात भाजपला वाढवण्यात गिरीषजींचे मोठे योगदान !

Pune : सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील.
Nitin Gadkari and Girish Bapat
Nitin Gadkari and Girish BapatSarkarnama

Nitin Gadkari paid tribute to Girish Bapat : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. (He was ill for the past several days)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसे ट्विट गडकरींनी केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘गिरीषजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जिवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीषजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

राजकीयदृष्ट्या भाजपला अतिशय प्रतिकूल काळ असताना पुण्यात भाजपला वाढवण्यात, मजबूत करण्यात गिरीषजींचे मोठे योगदान राहिले आहे. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील. महाराष्ट्रात विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले.

ते माझे अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक मित्र होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.’

Nitin Gadkari and Girish Bapat
Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरींना लॅंडलाईनवर धमकी देणाऱ्या जयेश पुजाराला नागपुरात आणले !

गिरीष बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ते ओळखले जात होते. काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती.

त्या परिस्थितीतही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती.

Nitin Gadkari and Girish Bapat
Girish Bapat News: पण नियतीला ते मान्य नव्हतं..; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे अक्षरश: रडू लागले

बापट (Girish Bapat) यांचा गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात दबदबा होता. त्यांच्याकडे पुण्याच्या (Pune) विकासाची दृष्टी होती. माणुसकी असलेल्या स्वभावाने अनेक माणसं जोडली. त्यांच्या पत्नीनेही दरवर्षी पंढरपूरची आषाढी वारी पायी चालत केली. ते एका विशिष्ट पक्षाचे नेते असले तरी बाकीच्या पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. पुण्याचे प्रतिनिधी म्हणून ते लोकसभेत गेले. तिथेही त्यांनी आपल्या स्वभावाने छाप पाडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com