Ankush Kakade On Girish Bapat: पण नियतीला ते मान्य नव्हतं..; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे अक्षरश: रडू लागले

Ankush Kakade comments on Girish Bapat's Demise: सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही तेवढ गिरीश यांनी माझ्यावर प्रेम केलं,
Girish Bapat News
Girish Bapat News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज (29 मार्च) प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.  (But destiny didn't accept that..; After the death of Girish Bapat, Ankush uncle literally started crying)

त्यांच्या निधनाची बातमी कळताच आठवणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे अत्यंत भावूक झाले होते. सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही तेवढ गिरीश यांनी माझ्यावर प्रेम केलं. आजकालचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले की त्यांच्याकडे संशयित नजरेने पाहिलं जातं पण गिरीश बापटांनी कधीही त्यांच्या पक्षाशी गद्दारी केली नाही. ते शेवटपर्यंत आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिले. कसब्याच्या निवडणुकीत त्यांना उभे राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण त्यांना कधी मत देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे.

Girish Bapat News
Ulhas Pawar On Girish Bapat's Demise: गिरीश बापटांच्या आठवणीने उल्हास पवारांना अश्रू अनावर

गिरीश बापट यांच्या मुलाला मुलगी झाली. आपल्या घरी नात आली, तिच्या येण्याने आता तरी ते बरे होतील, अशी आम्हाला आशा होती. पण नियतीला ते मान्य नव्हतं. राजकारण राजकारणाच्या जागी करावं पण राजकारणातही निखळ मैत्री कशी करावी हे गिरीश बापटांकडून शिकावं, आजकालच्या गढूळ राजकारणात बापट यांच्यासारखी मैत्री आपण ठेवावी, असा सल्ला मी आजकालच्या तरुण नेत्यांना, कार्यकर्त्यांना देईल.

दरम्यान, काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com