Girish Bapat News : दीड वर्षांपासून आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली !

Pune : पुण्याचे पालकमंत्री म्हणून बापट यांनी भरीव कामगिरी केली.
Sudhir Mungantiwar and Girish Bapat
Sudhir Mungantiwar and Girish BapatSarkarama

Sudhir Mungantiwar's tribute to Girish Bapat : पुण्याचे भाजप खासदार आणि विधिमंडळातील माझे सहकारी मित्र गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. १९७३ पासून राजकारणात सक्रिय असलेल्या गिरीश बापट यांनी पुण्यासह महाराष्ट्रात भाजपच्या यशस्वी वाटचालीत मोठे योगदान दिले. भाजपची पुण्याची ताकद म्हणून गिरीश बापट यांची ओळख होती. (Girish Bapat was known as the strength of Pune)

टेल्को कंपनीत १९७३ मध्ये काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या बापट यांनी नगरसेवक, आमदार, राज्यातील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाच वेळा आमदार असलेल्या बापट यांनी पुण्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून बापट यांनी भरीव कामगिरी केली. २०१९ पासून पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले. पुण्याच्या विकासाला त्यांनी अधिक वेग दिला. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यात उपचारही सुरू होते.

वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बापट यांच्या जाण्याचे मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो अशा शब्दांत सुधीर मुनगटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

Sudhir Mungantiwar and Girish Bapat
Girish Bapat News : प्रतिकूल काळात पुण्यात भाजपला वाढवण्यात गिरीषजींचे मोठे योगदान !

गिरीष बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ते ओळखले जात होते. काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती.

त्या परिस्थितीतही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती.

Sudhir Mungantiwar and Girish Bapat
Ajit Pawar On Girish Bapat Death : खासदार बापटांच्या निधनावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले,सर्वपक्षीय...

बापट (Girish Bapat) यांचा गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात दबदबा होता. त्यांच्याकडे पुण्याच्या (Pune) विकासाची दृष्टी होती. माणुसकी असलेल्या स्वभावाने अनेक माणसं जोडली. त्यांच्या पत्नीनेही दरवर्षी पंढरपूरची आषाढी वारी पायी चालत केली. ते एका विशिष्ट पक्षाचे नेते असले तरी बाकीच्या पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. पुण्याचे प्रतिनिधी म्हणून ते लोकसभेत गेले. तिथेही त्यांनी आपल्या स्वभावाने छाप पाडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com