नागपूर : कुटुंब आणि कायदा सुव्यवस्था, अशी दुहेरी जबाबदारी पोलिस निभावत असतात. हे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कोरोना काळात पोलिसांनी जिवाची बाजी लावून काम केले. हे बघता त्यांना २ महिन्यांचे अतिरिक्त वेतन सरकारने द्यावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आज विधानसभेत केली.
महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे जनसामान्यांचे सरकार आहे आणि महिलांच्या विषयांवर हे सरकार भक्कमपणे काम करीत असल्याचे शक्ती कायद्याच्या (Shakti Act) निमित्ताने दिसून आले आहे. त्यामुळे २ महिन्यांचे अतिरिक्त वेतन देण्यासोबतच पोलीस (Police) दलातील अन्य मागण्याही त्वरित पूर्ण कराव्या, असे आमदार धानोरकर (Pratibha Dhanorkar) म्हणाल्या. पोलीस कर्तव्यावर असताना मोठ्या प्रमाणात तणावात असतात. कौटुंबिक आणि समाज, अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात.
पोलीस दलाची मोठी कामगिरी त्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी मानसिक आजारी असल्याचे अनेक अहवालांतून समोर आले आहे. त्यामुळे पूर्णवेळ पोलिसांच्या सेवेत मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत केली. पोलीस स्टेशन परिसरात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी योग्य रित्या पार पाडण्याकरिता पोलीस स्टेशन परिसरात निवासाची व्यवस्था करण्याचीही मागणी त्यांनी केली.
पोलीस विभागाला कायदा व सुव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी तात्काळ पोलीस भरती करावी. पोलीस विभागाने कोरोना कालावधीत अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत कर्मचाऱ्यांना २ महिन्याचे अतिरिक्त वेतन सरकारने द्यावे. गृह विभागाने पोलिसांची पदोन्नती तसेच पोलीस विभागामार्फत महिला पोलिसांना फक्त आठ तास सेवा देण्याचा नियम करून त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचा जपण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील मुली मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत होत्या. त्यांना परत आणण्यात पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे. तसेच चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नगरसेवक नंदू नगरकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीचे कौतुक आमदार धानोरकर यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.