Gondia Ajit Pawar News : 9 महिन्यांनंतर आमदार पुत्राची घरवापसी, राजकीय विश्लेषकही चक्रावले !

Dr. Sugat Chandrikapure : डॉ. सुगत चंद्रिकापुरेंनी एकनाथ शिंदे गटाकडून रामटेक लोकसभेचे तिकीट मागितले होते.
Manohar Chandrikapure and Others
Manohar Chandrikapure and OthersSarkarnama
Published on
Updated on

Gondia Ajit Pawar News : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना-एकनाथ शिंदे यांच्या पक्षात काही नगरसेवकांसह प्रवेश केला होता. त्यानंतर अजित पवार गटसुद्धा सत्तेत सहभागी झाला. हे बघून आता सुगत चंद्रिकापुरे यांनी गेलेल्या नगरसेवकांसोबत तब्बल 9 महिन्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) घरवापसी केली. या घडामोडीने राजकीय विश्लेषकही चक्रावले आहेत.

डॉ. सुगत चंद्रिकापुरे हे अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीच्या नगराध्यक्षांसह इतर 13 नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात गेले होते. अवघ्या नऊ महिन्यांतच त्यांनी घरवापसी केली आहे. काल (ता. 22) कोहमारा येथील एरिया 51मध्ये त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.

सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, नगरसेवक आनंद अग्रवाल, नगरसेवक दानेश साखरे यांना सोबत घेऊन अर्जुनी मोरगावच्या तीन नगरसेवकांसह, नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, बांधकाम सभापती सागर आरेकर व नगरसेविका दीक्षा शहारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यांनीही घरवापसी करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manohar Chandrikapure and Others
Gondia ZP News : ग्रामपंचायतीच्या अधिकारावर जिल्हा परिषद सदस्यांचे अतिक्रमण !

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभा खासदारकीचा दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांना महायुतीने पुन्हा राज्यसभेवर पाठविले. त्यातच डॉ. सुगत चंद्रिकापुरे सहा दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. आता त्यांनी मुंबईहून परत येताच पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून मनोहर चंद्रिकापुरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ही आहेत घरवापसीची कारणे...

डॉ. सुगत चंद्रिकापुरेंनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रामटेक लोकसभेचे तिकीट मागितले होते. मात्र, त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्याने ते दुखावले गेल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्रच राष्ट्रवादी सोडून गेल्याने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याद्वारे आमदार चंद्रिकापुरे यांच्यावर दबाव अधिक वाढला होता. त्यानंतरही आमदार चंद्रिकापुरे यांना आपल्या मुलाचा पक्ष प्रवेश करून घेणे जिकिरीचे ठरले होते. अखेर मुलाचे मन वळवण्यात आमदार चंद्रिकापुरे यांना यश आले.

Edited By : Atul Mehere

R

Manohar Chandrikapure and Others
Gondia News : सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘आपला दवाखाना’ ‘आपुलकी’च्या उपचारातून बाद !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com