Gondia ZP News : ग्रामपंचायतीच्या अधिकारावर जिल्हा परिषद सदस्यांचे अतिक्रमण !

Tiroda Grampanchayat : निधी वाटपाबाबत जिल्हा परिषदेचा होणारा हस्तक्षेप हा चर्चेचा विषय ठरलेला आहे.
Gondia ZP
Gondia ZPSarkarnama
Published on
Updated on

अभिजीत घोरमारे (AG88)

Gondia ZP News : स्वच्छ भारत मिशन, दलित वस्ती, तांडा वस्ती, नरेगा व इतर कामे जी ग्रामपंचायतींच्या अधिकारात येतात, अशा कामांची प्रशासकीय मंजुरी गोंदियाचे काही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पंचायत समिती कार्यालयातून घेऊन जातात. हे एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आणणे आहे. हा प्रकार त्वरित न थांबविल्यास या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.

तिरोडा तालुक्यातील सरपंच संघटनेची सभा नुकतीच पंचायत समितीच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष विनोद लिल्हारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला तिरोडा तालुक्यातील सरपंच संघटनेचे सचिव शिशुपाल रहांगडाले, कोशाध्यक्ष श्यामराव बिसेन, निशा बावनकर, लक्ष्मी ठाकरे, प्रीती भांडारकर, झेगेकर, सुरेंद्र नागपुरे, प्रकाश ठाकरे, शिवकुमार शेंडे, स्वाती चौधरी, शरणागत, कांबळी, मार्गदर्शक राजू चामट व सरपंच उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gondia ZP
Gondia News : सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘आपला दवाखाना’ ‘आपुलकी’च्या उपचारातून बाद !

या बैठकीत सरपंच संघटनेच्या विविध मागण्यांबाबत भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते अनेक विषयांवर ठराव मंजूर करण्यात आले.

निधी वाटपाबाबत जिल्हा परिषदेचा होणारा हस्तक्षेप हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. जिल्हा परिषद त्यातही जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असणारा निधी स्वतःच्या कामासाठी वापरत असल्याची ओरड केली जात आहे.

दलित वस्तीपासून नरेगाच्या सर्वच कामांत जिल्हा परिषदेचा हस्तक्षेप वाढला आहे. एकीकडे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिक पातळीवर अधिक महत्त्व देऊन तिला सक्षम बनवण्याचे काम करीत आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचा अतिरेकी हस्तक्षेप वाढला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, तर त्या निधीवरही जिल्हा परिषदेचा डोळा असल्याची ओरड या सरपंच बैठकीत करण्यात आली. दरम्यान, याबाबत तक्रार करणार असल्याची चर्चा सरपंच संघटनेने केली आहे. हे असेच सुरू झाले तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.

Edited By : Atul Mehere

R

Gondia ZP
Gondia ACB Trap : लाचेचा मोह..! सरपंच, उपसरपंच, दोन ग्रामपंचायत सदस्य निलंबित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com