Praful Patel News : जयंत पाटलांच्या मुक्कामावर बोलताना सुळेंचे स्वागत; प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil, Supriya Sule : प्रफुल पटेलांनी टर्म बाकी असताना कुणासाठी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा?
Praful Patel
Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळेंबाबत सूचक विधान केले आहे. जयंत पाटलांनी आमच्याकडे यावे, हीच इच्छा आहे. मात्र त्यांचा मुक्काम कुठेतरी असेल, असे म्हणत पटेलांनी सुप्रिया सुळेंचेही आमच्या पक्षात स्वागत आहे, असे विधान केले. पटेलांच्या या वक्तव्यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चांना पुन्हा हवा मिळण्याची शक्यता आहे. (Praful Patel News)

प्रफुल पटेलांनी (Praful Patel) खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना अनेक गौप्यस्फोट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यसभेची टर्म बाकी असताना पटेलांनी राजीनामा दिला. तसेच त्यांना पुन्हा राज्यसभेची खासदारकीही मिळाली. यावर छेडले असता त्यांनी एका मोठ्या नेत्यासाठी खेळी करावी लागल्याचे स्पष्टपणे सांगितले, तर जयंत पाटील आज ना उद्या कुठेतरी मुक्कामाला असतील, असे म्हटल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praful Patel
Indapur Politics : धमकीच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचा नेता करणार हर्षवर्धन पाटलांचा गैरसमज दूर

ते म्हणाले, राज्यसभेबाबत आमची एका मोठ्या नेत्यासोबत चर्चा सुरू होती. त्यांच्यासोबत काही बैठकाही पार पडल्या. मात्र, त्यांचा निर्णय पुढे ढकलला. आता नाहीतर लवकरच तो चेहरा अजित पवारांच्या (Ajit Pawar) गोटात असणार आहे. दरम्यान, काही दिवस त्यांचे नाव गुलदस्तात राहील, असा गौप्यस्फोट पटेलांनी केला. तसेच ती मोठी व्यक्तीच काय सुप्रिया सुळे (Supriya Sule) आमच्यासोबत आल्या तर त्यांचेही स्वागत आहे. त्यांना आमचा कधीच नकार नाही. आमचे नेते त्यांच्यावर टीका करत नाहीत, असेही पटेलांनी सांगितले.

दरम्यान, जयंत पाटलांच्या (Jayant Patil) भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगत आहेत. त्यांनी वारंवार खुलासा करूनही चर्चा थांबताना दिसत नाहीत. यातच पटेलांनी पाटलांचा मुक्काम कुठेतरी असेल, असे विधान केले आहे. आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध असून, ते एका रात्रीत संपणार नाहीत. आमच्या सर्व गोष्टी एकमेकांना माहिती असतात. जयंत पाटील आमच्यासोबत यावेत अशीच इच्छा आहे. मात्र, आज ना उद्या ते कुठेतरी मुक्कामाला असतील, असे पटेल म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Praful Patel
Ashok Chavan Meet Pm Modi : विमानतळावर भेट अन् भाजपवासी अशोक चव्हाण यांनी मानले PM मोदींचे आभार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com