Gondia Teacher News : खासगी संस्थाचालकही करेना पवित्र पोर्टलमार्फत भरती !

Teacher Vacancy Issue : गुरुजींच्या हजारो जागा रिक्त तरी शाळा संस्थापकांची जाहिराती काढण्यासाठी टाळाटाळ.
Teacher and Students
Teacher and StudentsSarkarnama

Gondia Teacher News : गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या गंभीर झाली आहे. विशेष म्हणजे, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्येही ही समस्या आहे. पूर्वी शाळेतील पदे भरण्यासाठी उत्सुक राहणारे खासगी संस्थाचालक आता पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबवावी लागत असल्याने रिक्त पदे भरण्याबाबत उदासीन झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच की काय पवित्र पोर्टलवर रोस्टर तपासून पद भरतीच्या जाहिराती अपलोड करण्याचे प्रमाण नगण्य आहे.

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1072 शाळा, खासगी अनुदानित 253 शाळा, नगर पालिका 18, अशा एकूण 1343 शाळा आहेत. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 1069 शाळा असून, या शाळांमध्ये 86 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण विभागात एकूण 3874 पदे मंजूर असून, यांपैकी 3055 पदे भरली आहेत, तर 819 पदे अद्यापही रिक्त आहेत. यात मात्र सुरुवातीला प्राथमिक श्रेणीत काही शाळांकडून जाहिरात देण्यात आली होती. पण त्रुटीमुळे ती रद्द करण्यात आली.

Teacher and Students
Gondia Tantamukt Committee : भाऊ, तंटामुक्त समिती करते तरी काय? तंटामुक्त गावातील तंटे पोहोचले पोलिस ठाण्यात !

माध्यमिक शाळांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याने एकाही शाळेने भरतीसंदर्भात जाहिरात दिली नाही. पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेपूर्वी संस्थाचालक रिक्त जागा भरण्यासाठी कायम उत्सुक असायचे किंवा रिक्त होण्याची वाट बघायचे, कारण पद भरताना आर्थिक व्यवहाराला जागा होती. एका-एका पदासाठी लाखो रुपये देणाऱ्यांचीही कमी नाही. शिवाय याच्या-त्याच्या वशिलेबाजीने पदे भरण्याचा प्रकार सर्रास चालायचा, पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रियेने या गैरप्रकारावर लगाम लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याविषयी गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये यांच्याकडून माहिती घेतली असता ‘सरकारनामा’शी बोलताना त्यांनी सांगितले की, पवित्र पोर्टलवर माहिती भरण्यासंदर्भात खासगी संस्थांना वेळोवेळी अवगत करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार संस्थांची जी पदे रिक्त आहेत, ती पवित्र पोर्टलमार्फतच भरण्यात येणार आहेत.

दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात डीएड, बीएड झालेले, अभियोग्यता चाचणी दिलेले जवळपास 12 हजारांपेक्षा अधिक उमेदवार आहेत. यांपैकी बहुतांश उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. तर कित्येक परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या तयारीत आहेत. असे असले तरी राज्य शासनाने कंत्राटी शिक्षक भरतीबाबत 7 जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांना कंत्राटी पदे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कंत्राटी शिक्षकांना मासिक 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. तसेच ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची असली तरी शासनाचे काम मात्र निघत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com