Gondpipari Politics : नगरपंचायत इमारतीच्या उद्घाटनासाठी आमदारांचे गुडघ्याला बाशिंग !

MLA Subhash Dhote : २४ तास काम सुरू, नगराध्यक्षांना नवीन इमारतीमध्ये बसण्याचे वेध.
Savita Kulmethe and MLA Subhash Dhote
Savita Kulmethe and MLA Subhash DhoteSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच आपल्या क्षेत्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन व्हायला हवे, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी अट्टहास चालवला आहे.

गोंडपिपरी नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे, यासाठी त्यांनी 26 जानेवारीचा अल्टीमेटम दिला आहे. तर नगराध्यक्षाचा कालावधी संपण्यापूर्वीच नवीन इमारतीमधील केबीनमध्ये बसायला मिळावे, यासाठी गोंडपिपरी नगरपंचायतीच्या कामाला गती मिळाली आहे. येत्या 26 जानेवारीला म्हणजेच गणराज्यदिनी या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Savita Kulmethe and MLA Subhash Dhote
Chandrapur : गाव तहानेने व्याकुळलेले, अशात महिला सरपंचांने केले असे काही की...

चंद्रपुरातील आदिवासी दुर्गम अन् अविकसित असलेला गोंडपिपरी तालुका नेहमीच उपेक्षित राहिला आहे. याच तालुक्याच्या भरवशावर राजू-याच्या शिलेदारांनी आजवर सत्ता भोगली. पण येथील शेतकरी, कष्टक-यांना ते न्याय मिळवून देऊ शकले नाहीत. तालुक्यात तीन मोठ्या बारमाही वाहणाऱ्या नद्या असतानाही त्यांना याठिकाणी सिंचनाची सुविधा उपलब्ध करता आली नाही. रोजगार नसल्याने येथील भूमिपुत्रांना भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील बेरोजगारांच्या झुंडीच्या झुंडी तेलंगणा राज्यात अल्प पगारावर रोजीरोटी कमवत आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसची सत्ता आहे. सुभाष धोटे हे दुस-यांदा या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राजूरा विधानसभा क्षेत्रात येणा-या राजूरा, कोरपणा, जिवती अन् गोंडपिपरी या चारही तालुक्यातील ब-याच ठिकाणी त्यांच्याच स्थानिक शिलेदारांच्या हाती नेतृत्वाची दोरी आहे. देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. एकदा आचारसहिंता लागली की मग आपल्या क्षेत्रातील कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करता येणार नाही, याची जाणीव आमदार धोटेंना झालेली आहे. त्यामुळेच नगरपंचायतीच्या उद्घाटनासाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

गोंडपिपरीत 2 कोटी रूपये खर्चून नगरपचांयतीची नवीन इमारत बांधली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे. पण ते अद्यापही पूर्ण झाले नाही. इमारत तयार झाली असली तरी अजून बरेच काम होणे बाकी आहे. पण आचारसंहिता लागेल अन् या भव्यदिव्य इमारतीचे उद्घाटन आपणास करता येणार नाही. या भावनेतून आता कुठल्याही परिस्थितीत 26 जानेवारीला इमारतीचे उद्घाटन करायचेच, असा आदेश आल्यानंतर इमारतीच्या कामाला बराच वेग आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सविता कुळमेथे या गोंडपिपरी नगरपंचायतीच्या अध्यक्ष आहेत. त्यांचा नगराध्यक्षपदाचा कालावधी संपायला जास्त वेळ राहिला नाही.अशात पद जाताजाता या नवीन इमारतीच्या केबीनमधून आपल्या कारकिर्दीला विराम मिळावा, अशी त्यांची स्वाभाविक इच्छा आहे. या ध्येयाने पछाडलेल्या लोकप्रतिनिधीच्या आग्रहास्तव आता नगरपंचायतीचे काम दिवसरात्र सुरू आहे. येत्या 26 जानेवारी म्हणजे गणराज्यदिनी या इमारतीचा उद्घाटन सोहळा होणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com