Devendra Fadanvis : दसरा मेळाव्यासाठी सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही !

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी आज तब्बल २५०० किलोचा महाप्रसाद बनविला. पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या या विक्रमी उपक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भेट दिली.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी अतिशय महत्वाचा सण. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) होते तेव्हापासून तर आत्तापर्यंत शिवसैनिक दसरा मेळाव्याची आतुरतेने वाट बघत होते. याहीवर्षी परिस्थिती तशीच आहे. पण यावेळी दसरा मेळावा कुणाचा, यावरून शिवसैनिकच नव्हे तर प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना विचारले असता दसरा मेळाव्यासाठी सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे आणि सद्यःस्थितीत आकर्षण आहे, ते म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा. दोन्ही गटांकडून दसरा मेळावा आमचाच, असा दावा केला जात आहे. त्यातच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान ब्लॉक केला असल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात फडणवीस यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेले नाही. नियमात असेल त्यांना मैदान दिले जाईल.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी आज तब्बल २५०० किलोचा महाप्रसाद बनविला. पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या या विक्रमी उपक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होणार होती. पण आता ती सुनावणी २७ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात विचारे असता ते म्हणाले, आज सुप्रिम कोर्टात सुनावणी आहे. आम्ही आमची बाजू मांडू, ते त्यांची बाजू मांडतील. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यावर निकाल देईल. एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर बोलणे अनुचित आहे, असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.

Devendra Fadanvis
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस राजकीय नव्हे खरी फोडणी देतात...

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांन टीका केली. शहांचा दौरा म्हणजे वरून कीर्तन आणि खालून लावणी, असे वक्तव्य त्यांनी केले. याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा आली आहे. त्या निराशेतून ते बोलत आहेत आणि निराश लोकांवर फार कॉमेंट द्यायची नसते. असे म्हणत ठाकरेंच्या त्या वक्तव्याला आपण महत्व देत नाही, असे त्यांनी सुचविले.

अण्णाभाऊ साठे पुतळा - अभिमानाची बाब..

अण्णाभाऊ साठे हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि गर्वाचे आहे. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोमध्ये लागतो आहे. याचा अभिमान आहे. तमाम भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यासाठी मला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निमंत्रण दिले गेले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com