Washim : "आता मी नियमित येणार!" वाशीमचे सावत्रपण संपण्याचा दत्तामामा भरणेंचा शब्द

Dattatray Bharne : वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन आता दोन तप झाले. पण गत 25 वर्षांत काही अपवाद सोडल्यास या जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री कधी मिळालाच नव्हता.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Washim News : वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन आता दोन तप झाले. पण गत 25 वर्षांत काही अपवाद सोडल्यास या जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री कधी मिळालाच नव्हता. यापूर्वीचे संजय राठोड, शंभूराज देसाई, हसन मुश्रीफ हे केवळ झेंडा मंत्री ठरले होते. त्यामुळे जिल्ह्याला सावत्रपणाचा अनुभव येत होता. पण आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे पालकमंत्रीपद आले आहे. नुकतेच ते जिल्ह्यात येऊन पायधूळ झाडून गेले आहेत, पण जाताना मी नियमित येणार असा शब्द देऊन गेले आहेत. त्यामुळे आता तरी वाशीमचे सावत्रपण संपेल अशी आशा आहे.

वाशीम जिल्हा मानव विकास निर्देशांकात अगदी तळाला आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून केंद्र सरकारने जिल्ह्याला अनेक योजना मंजूर केल्या. पण पालकमंत्र्यांआभावी या योजनांचा निकाल कधी दिसलाच नाही. जिल्ह्याचा विकासच प्रभावित झाला. जिल्ह्यातील मंगरूळ पीर, मानोरा आणि मालेगांव हे तालुके दुर्गम भागात आहेत. या तालुक्यात कोणताही उद्योग नाही. त्यामुळे या भागातून मजुरांचे सर्वधिक स्थलांतर होते. मात्र गत 25 वर्षांत या भागात स्थायी रोजगार निर्माण करण्यास इथली संपूर्ण राजकीय व्यवस्थाच अपयशी ठरली आहे.

Dattatray Bharne
Hasan Mushrif : परक्या जिल्ह्यात जीव न रमलेले 'मुश्रीफ' एकटेच नाहीत... डझनभर मंत्री करतायत 'जुलमाचा राम राम'

2014 मध्ये राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राठोड यांच्याकडे यवतमाळसोबत वाशीमच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. पण त्यांचे बऱ्यापैकी लक्ष यवतमाळकडेच असायचे. 2019 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभूराज देसाई पालकमंत्री झाले. पण अडीच वर्ष ही जबाबदारी एक प्रकारे ओझे झाल्याचे भावना त्यांनी उघडपणे कबूल केली होती. ते फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या प्रमुख दिवशीच जातीने हजर असायचे. अन्यथा सर्व बैठका मंत्रालयातच पार पडायच्या.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी पुन्हा संजय राठोड पालकमंत्री झाले. पण पुन्हा यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्याची विभागून जबाबदारी मिळाली. यावेळी देखील पोहरादेवी व्यतिरिक्त लक्षात राहण्यासारखे कोणतेच ठोस काम त्यांनी केले नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. पण त्यांनी जिल्ह्यात येण्याआधीच जबाबदारी झटकून टाकली. 630 किलोमीटरवरून त्यांना जिल्ह्याच्या कारभार हाकणे पसंत नव्हते.

Dattatray Bharne
Waqf Board Amendment Bill Latest Update : लोकसभेत शेवटच्या क्षणी पत्ते ओपन! उद्धव ठाकरेंच्या खासदारांचे वक्फ विधेकाच्या विरोधात मतदान

आता आठ दिवसांपूर्वी दत्ता मामा भरणे नव्याने पालक मंत्री झाले आहेत. त्यानंतर ते तातडीने जिल्ह्यातही आले, बैठक घेतली. पण जाताना पुन्हा येण्याचा शब्द दिला आहे. मी झेंडा मंत्री न ठरता वेगळा पालकमंत्री ठरेन, मी आता नियमित येणार आहे, असे ते म्हणून गेले आहेत. त्यामुळे वाशीमचे सावत्रपण संपेल अशी आशा निर्माण झाली आहे. "मामा तुम्ही आता दिलेल्या शब्दाप्रमाणे नियमित याच... असा जिल्हावासियांचा सूर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com