मोहोळमधून संधी मिळाली नसती, तर आज मी माळशिरसचा आमदार असतो : राष्ट्रवादी आमदार मानेंचा गौप्यस्फोट

माळशिरस मतदारसंघाचे गणित पाहता मोहिते पाटील यांची मदत घेतल्याशिवाय तेथून निवडून येणे कठीण आहे.
Ranjit Singh Mohite Patil-Rajan Patil-yashvant Mane
Ranjit Singh Mohite Patil-Rajan Patil-yashvant ManeSarkarnama
Published on
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मोहोळचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी आज (ता. ३० ऑक्टोबर) मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘मला मोहोळ (Mohol) विधानसभा सदस्याची संधी मिळाली नसती, तर मी आज माळशिरसचा (Malshiras) आमदार दिसलो असतो, तसे आमचे सर्व ठरलेही होते,’ असा गौप्यस्फोट त्यांनी भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासमोरच केला. (I Had not got opportunity from Mohol, I would be MLA of Malshiras today : Yashwant Mane)

आमदार यशवंत माने यांच्या गौप्यस्फोटाने मोहोळ मतदारसंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. कारण, माळशिरस मतदारसंघाचे गणित पाहता मोहिते पाटील यांची मदत घेतल्याशिवाय तेथून निवडून येणे कठीण आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मोहिते पाटील हे भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. त्यामुळे यशवंत माने यांनी मोहिते पाटील यांच्या माध्यमातून भाजपकडे फिल्डिंग लावली होती की काय, असा प्रश्न त्यांच्या वक्तव्यावरून उपस्थित होत आहे.

Ranjit Singh Mohite Patil-Rajan Patil-yashvant Mane
रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी वकिली करू; भाजपमध्येही आमचे ऐकणारे आहेत : राजन पाटलांचे मोठे वक्तव्य

मोहोळमधून संधी मिळाली नसतील तर कदाचित मी माळशिरसमधून निवडून आलो असतो. आमचं तसं सर्व ठरलं होतं, याचा अर्थ विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मोहिते पाटील यांच्याशी चर्चा झाली होती की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. वास्तविक माने हे इंदापूरचे रहिवाशी आहेत. ते इंदापूर बाजार समितीचे उपसभापती होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून त्यांनी ही पदे उपभोगली आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Ranjit Singh Mohite Patil-Rajan Patil-yashvant Mane
'मी बोअर झालोय, मला गाणं म्हणून दाखव' : अवर सचिवाची महिला अधिकाऱ्याकडे फर्माईश!

दरम्यान, मोहोळ तालुक्यातील पापरी येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील यांनीही बदलत्या राजकारणची चुणूक दाखविणारी विधाने केली आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. बऱ्याच दिवसानंतर ते मोहोळमधील कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता होती.

Ranjit Singh Mohite Patil-Rajan Patil-yashvant Mane
उपोषण स्थगित करताच शिवसेना आमदार पाटलांचा सरकारला खणखणीत इशारा

या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी ‘सोलापूर जिल्हा अगोदर राष्ट्रवादीमय होता, तो आता कमी झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळावी, त्याच्यासाठी आम्ही वकिली करू; कारण भाजपमध्ये आमचेही ऐकणारे कोणीतरी आहेत, असे सांगून आपले भाजपमधील वजन प्रवेशाआधीच दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com