प्राध्यापिकेचा विनयभंग; दोन प्रार्चायांवर गुन्हा दाखल...

संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संजय वासाडे Sanjay Wasade आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. बाबासाहेब वासाडे Ad. Babasaheb Wasade यांची ही संस्था आहे.
Dr. Rajnikant and Prof. S.S. Goje
Dr. Rajnikant and Prof. S.S. GojeSarkarnama

चंद्रपूर : बल्लारपूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नालॉजी, बामणीच्या दोन्ही प्राचार्यांवर एका महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. रजनीकांत मिश्रा आणि श्रीकांत गोजे अशी या प्राचार्यांची नावे आहेत. ते दोघेही फरार झाले आहे. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संजय वासाडे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते अॅड. बाबासाहेब वासाडे यांची ही संस्था आहे.

संजय वासाडे यांच्यासह या दोन्ही प्राचार्यांनी काल रविवारी माध्यमांसमोर येवून प्राध्यापिकेचा विनयभंग आणि देशी कट्टा विद्यार्थ्यांकडून मागितल्याची बाब फेटाळली होती. बल्लारपूर पोलिस ठाण्यात त्याच रात्री दोन्ही प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाला आणि वासाडे तोंडघशी पडले. त्यानंतर दोन्ही प्राध्यापक फरार झाले.

Dr. Rajnikant and Prof. S.S. Goje
अनिल देशमुखांच्या मुंबई, नागपूर व काटोलच्या मालमत्तेवर आयकर विभागाच्या धाडी...

पिडीत प्राध्यापिका या संस्थेत मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. सहा ऑक्टोंबरला ती आपल्या कक्षात काम करीत असताना प्राचार्य रजनीकांत मिश्रा आणि श्रीकांत गोजे तिथे आले. गोजे या संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य आहे. या दोघांनीही प्राध्यापिकेला तिच्या कक्षात अश्लिल शिवागाळ केली. तिचा हात पकडला आणि तिचे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला. झाला प्रकार तिने संस्थेचे कार्याध्यक्ष वासाडे यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु वासाडे यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट या दोघांचीही पाठराखण केली.

या प्राध्यापिकेने बल्लारपुर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. त्याचवेळी मिश्रा, गोजे आणि वासाडे पोलिस ठाण्यात पोहोचले. त्या दिवशी पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. या तिघांनीही प्राध्यापिकेला महाविद्यालयात नेले आणि एक साधी तक्रार लिहून घेतली. सात ऑक्टोंबरला तिचा भ्रमणध्वनी आणि लॅपटॉप फोडण्याचा प्रयत्न एका कर्मचाऱ्याने केला. ८ ऑक्टोंबरला तिचा माफीनामा वासाडे यांनी लिहून घेतला आणि संस्थेच्या वाहनाने एका कर्मचाऱ्यासोबत भद्रावतीला रवाना केले. दरम्यानच्या काळात मिश्रा आणि या प्राध्यापिकेच्या संभाषणाची एका ध्वनिफीत समोर आली.

संस्थाचालक आणि प्राचार्यांकडून या प्राध्यापिकेचा आणखी झळ सुरु झाला. या काळात मिश्रा यांनी तिच्याशी अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण अंगलट येणार, असे लक्षात येताच या प्राध्यापिकेचा आरोप निराधार असल्याचा दावा संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे यांनी दोन्ही प्राध्यापकांसह माध्यमांसमोर येऊन केला. त्याचवेळी काल रविवारी ही प्राध्यापिका बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत होती. शेवटी पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली आणि मिश्रा, गोजे यांच्यावर भादंवी ३५४, ३५४ (अ), ३५४ अ(१), ३५४-बी, ३५४- डी , ५०६, ५०९, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला.

Dr. Rajnikant and Prof. S.S. Goje
छगन भुजबळांचे यश; नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय

प्राचार्यांना हवा देशी कट्टा

प्राचार्य रजनीकांत मिश्रा यांनी ३ ऑक्टोंबरला पिडीत प्राध्यापिकेशी तिच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मिश्रा यांना तिच्याकडे झारखंड आणि बिहारच्या विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मागितले. या संभाषणात मला देशी कट्टा मागवायचा आहे, असे मिश्रा या प्राध्यापिकेला सांगत आहे. देशी कट्टा कशासाठी, असे विचारताच मिश्रा तुला मारण्यासाठी अशी धमकी देत आहे. सध्या ही ध्वनिफित समाज माध्यमांवर चांगलीच गाजत आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत या ध्वनिफीतीसह गोजे आणि मिश्रा मादक पदार्थांचे सेवन करतात. ते झारखंड आणि बिहारमधील विद्यार्थ्यांकडून अमली पदार्थ मागवितात, असा खळबळजनक आरोप प्राध्यापिकेने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com