Nagpur Winter Session : बुलढाणा रुग्णालयातील घोटाळ्याची नव्यानं चौकशी

Sanjay Gaikwad : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत घोषणा; 99 कोटींचा गैरव्यवहार
MLA Sanjay Gaikwad on Buldhana Government Hospital.
MLA Sanjay Gaikwad on Buldhana Government Hospital.Google
Published on
Updated on

Buldhana News : बनावट खरेदीची बिलं दाखवित बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या 99 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा बुधवारी (ता. 13) विधानसभेत पुन्हा गाजला. बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात आवाज उठविला.

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात साहित्य आणि औषधींची खरेदी केल्याचं दाखविण्यात आलं होतं. या खरेदीपोटी दाखविण्यात आलेली बिलं बनावट असल्याचं उघडकीस आलं होतं. यासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.

MLA Sanjay Gaikwad on Buldhana Government Hospital.
Nagpur Winter Session : 'सुशांत राजपूत, दिशा सालियन यांची हत्याच!'

आमदार संजय गायकवाड यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीनंतरही सत्य बाहेर आले नाही. त्यामुळं आमदार संजय गाकवाड यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळीअधिवेशनादरम्यान विधानसभेत हा विषय पुन्हा मांडला. आरोग्य विभागातील जे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्याच हाती चौकशी सोपविण्यात आल्याबद्दल आमदार गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. दोषी व्यक्तींकडून कशी काय चौकशी केली जाऊ शकते असा प्रश्न त्यांनी मंत्र्यांना विचारला.

साहित्य आणि औषध घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही. आवश्यक ती कागदपत्रं पुरविली नाही, असे गायकवाड यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिलं. बुलढाणा सामान्य रुग्णालयात अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत. येथे अत्याधुनिक यंत्रसामग्रीही कार्यरत नाही, हा विषयही गायकवाड यांनी पटलावर मांडला. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचारी सहकार्य करीत नसल्यानं त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली होती. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याकडं आमदार गायकवाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचं लक्ष वेधलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गायकवाड यांचा मुद्दा पूर्ण झाल्यानंतर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुलढाण्यातील साहित्य व औषध खरेदीचा मुद्दा खरच गंभीर असल्याची कबुली दिली. यासंदर्भात आधी चौकशी करण्यात आली होती. परंतु त्यावर आमदार गायकवाड यांचं समाधान न झाल्यानं संपूर्ण प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचं त्यांनी सभागृहात जाहीर केलं. यावेही एसीएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत ही चौकशी केली जाईल, असंही डॉ. सावंत यांनी नमूद केलं. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही व तसा प्रयत्न करणाऱ्यांनाही प्रसंगी गंभीर परिणामांना तोंड द्याचं लागेल असंही आरोग्य मंत्री म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

MLA Sanjay Gaikwad on Buldhana Government Hospital.
Nagpur Winter Session : अमरावती, नागपुरातील शस्त्रसाठ्याचा मुद्दा गाजला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com