Sushant Sing Rajput Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू नैसर्गिक नाही. तिची हत्याच झाल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वरील दावा केला.
सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूचा तपास एसआयटी करणार आहे. आपली इच्छा आहे की, एसआयटीनं आपल्याला चौकशीसाठी बोलवावं. आपल्याजवळ याप्रकरणाशी संबंधित काही पुरावे व पेन ड्राइव्ह आहेत. हे पुरावे, पेनड्राइव्ह आणि साक्ष एसआयटीपुढं द्यायची माझी इच्छा आहे, अशी इच्छा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. सुशांत यांनी गळफास घेतल्याचं सांगण्यात येत होतं. याप्रकरणी 27 जणांचे जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवले होते. अद्यापी या प्रकरणाचं गूढ कायम आहे. सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबईमध्ये १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या दोन्ही मृत्यू प्रकरणावरून भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदार पुत्र आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याला विरोध केला होता. कुटुंबीयांचं म्हणणं होतं की, दिशाच्या मृत्यूची आधीच कसून चौकशी करण्यात आली आहे. आता पुन्हा एसआयटी चौकशीनं गमावलेली मुलगी परत येणार आहे का? त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांनी याप्रकरणी ‘क्लोजर रिपोर्ट’ही दाखल केला होता.
सुशांत प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) दिशा सालियनच्या मृत्यूला 'अपघात' म्हटलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. दिशाच्या मृत्यूबाबत सुशांत आवाज उठवणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूप्रकरणात वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचंही नाव चर्चेत आलं होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांच्या ‘लोकेशन ट्रेसिंग’च्या मागणीनं जोर धरला होता. नार्को टेस्टची मागणीही करण्यात आली होती. अशातच आता आमदार नितेश राणे यांनी पुन्हा सुशांत आणि दिशाप्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. आपल्याकडे पुराव्यांचा पेनड्राइव्ह असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या दोन्ही प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.