अकोला : हिंदुस्थानी भाऊ जिंदाबाद.., हिंदुस्थानी भाऊ जिंदाबाद... अशा घोषणा देत अकोला (Akola) येथेसुद्धा शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आगामी १०वी आणि १२वीच्या परीक्षा (Exam) रद्द कराव्या किंवा ऑनलाइन घ्याव्या, अशी मागणी करीत विद्यार्थी (Students) आक्रमक झाले. एका ‘हिंदुस्थानी भाऊ’ने सोशल मिडियावरून चिथावणी दिल्यामुळे आज विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकले आहे. विकास पाठक, असे या हिंदुस्थानी भाऊचे नाव असल्याची माहिती आहे.
अनेक विद्यार्थ्यांना हा हिंदुस्थानी भाऊ आहे कोण, याचीसुद्धा माहिती नाही. तरीही विद्यार्थी त्याच्या चिथावणीवरून आक्रमक झाले आहेत. अकोल्यात आज दुपारी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या हिताची गोष्ट केल्यामुळे लोक त्याच्या मागे लागल्याचे बघायला मिळत आहे. कुठलीही चर्चा न करता थेट रस्त्यावर उतरण्याची चिथावणी दिल्यामुळे आजचे आंदोलन भडकले आहे. नागपुरात तर विद्यार्थ्यांनी शहर वाहतूक विभागाची एका बसच्या काचा फोडल्या. दुसऱ्या एका ठिकाणी स्कूल बसवरही दगडफेक केली.
गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी ६ ते ८ इंचाच्या मोबाईलवर क्लास करीत आहेत. प्रश्न उत्तरे सर्वकाही मोबाईल आणि लॅपटॉपवरच सुरू आहे. आता ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. कारण आतापर्यंतच्या टेस्टसुद्धा ऑनलाइन होत आहेत. आता लिहिण्याचा सराव राहिलेला नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेऊ नये, ऑनलाइनच घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
येवढ्या मोठ्या संख्येने मुले रस्त्यावर उतरली, हे धोकादायक आहे. कोरोना या काळात तर अशा आंदोलनांमुळे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. पालक आणि विद्यार्थी धास्तावलेले आहे. त्यामुळे त्यांना असे अचानक ऑफलाइन परीक्षेला बोलावणे योग्य नाही. गेल्या दोन वर्षांत सरकारने काय केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऑफलाइन परीक्षेच्या तारखा घोषित झाल्यानंतर विद्यार्थी तणावात आले आहे. कारण गेल्या दोन वर्षांत मुलांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन घ्याव्या, अशी मागणी पालकांचीही आहे. पण विद्यार्थ्यांना आक्रमक होऊ नये, तर त्यांनी संबंधित मंत्री अधिकारी याच्याशी चर्चा करावी, असेही नागपुरातील काही पालकांनी ‘सरकारनामा’ सांगितले.
पालक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय हा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. सरकार आदेश काढून मोकळे झाले. पण कोरोना, ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना शाळा सुरू करीत असल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. सरकारने हा निर्णय घेतला नसता, तर हेच विद्यार्थी घरी बसून अभ्यास करीत असते. पण आधीच घाबरलेले विद्यार्थी आक्रमक झाल्यामुळे आजची स्थिती उद्भवली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ऑफलाइन परीक्षा रद्द करावी किंवा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.