Hiraben यांच्यामुळे नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व जगावेगळे निर्माण झाले : फडणवीस

Devendra Fadanvis : आदरणीय हिराबा यांच्यामुळे आम्हा सर्वांनाही प्रेरणा मिळत आली आहे.
Hiraben
HirabenSarkarnama

Prime Minister Narendra Modi's mother passed away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे आज पहाटे निधन झाले. आदरणीय हिराबा यांच्यामुळे आम्हा सर्वांनाही प्रेरणा मिळत आली आहे. या दुःखाच्या काळात आम्हा सर्वांच्या सद्भावना मोदींसोबत आहेत. त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती, मिळो, अशी मी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

फडणवीस म्हणाले, १०० वर्षांचे संघर्षपूर्ण पण तेवढेच अर्थपूर्ण आयुष्य त्या जगल्या. मागील काळात हा अनुभव देशाने घेतला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर त्यांचा विशेष स्नेह होता. मागील वाढदिवसाला जेव्हा आईला भेटलो तेव्हा, ‘कोणतेही काम बुद्धीने आणि आत्म्याच्या शुद्धीतून केले पाहीजे’, असा बहुमोल संदेश त्यांनी दिल्याचे मोदींनी आज सांगितले. संघर्षमय जीवन जगताना त्यांनी मोदींवर जे संस्कार केले. त्यामुळेच मोदींचे व्यक्तिमत्व जगावेगळे निर्माण झाले आहे. त्यांच्या सेवाभाव आहे, त्यागाची भावना आहे. त्यांच्या आई हिराबा यांच्यामुळे ते असे घडलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनाजी बातमी दुःखद आहे. त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. त्यांनी अवघड आणि संघर्षमय जीवन जगताना जे संस्कार परिवाराला दिले. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व देशाला मिळाले. अतिशय सरळ आणि मायेने ओतप्रोत असलेले त्यांचे व्यक्तिमत्व सदैव आमच्या स्मरणात राहिल. ईश्‍वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई हे ऊर्जेचे, शक्तीचं स्रोत असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्याशी अतूट जिव्हाळ्याच नातं होतं, हे नेहमीच दिसून आलं. अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Hiraben
Heeraben Modi News Update : हिराबेन मोदी अनंतात विलीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली. ऐकून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाच्या शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं आहे, ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या परिवाराला मिळो, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिराबेन यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com