

Hivarkhed NagarParishad News : हिवरखेड नगरपरिषदेच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका 20 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकीत भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला एमआयएम व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सूचक व अनुमोदक म्हणून पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिवरखेड नगरपरिषदेतील विविध समित्यांच्या सभापती पदांसाठी पुढीलप्रमाणे निवडी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आरोग्य सभापतीपदी वंदना राजेश वानखडे, बांधकाम सभापती पदी वैभव गावंडे, पाणीपुरवठा सभापती पदी अजीज खा जमीर खां, महिला व बालकल्याण सभापतीपदी प्रमिला रविंद्र मानकर, नियोजन व विकास समिती सभापतीपदी प्रतिभा वीरेंद्र येऊल यांची निवड करण्यात आली आहे.
मात्र या निवडणुकीबाबत पत्रकारांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने अधिकृत तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून अनिता रविंद्र वाकोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेना गटाकडून शीतल प्रमोद पोके यांनी अर्ज भरला होता.
भाजपच्या उमेदवारासाठी सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबी नाज अब्दुल सलमान यांनी, तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे नगरसेवक आजम खान यांनी सह्या केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निवडणुकीत अनिता वाकोडे यांना एकूण 4 मते मिळाली, तर शीतल प्रमोद पोके यांना 1 मत मिळाले. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी अनिता वाकोडे यांची निवड झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.