Congress News : 'विरोधी पक्षनेतेपद कसे आणले ?' तुमचे समर्थक हे माझेच आमदार; वडेट्टीवारांच्या खुलाश्याने सगळेच अवाक..

Vijay Wadettiwar On Congress Politics : विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीचा मजेदार किस्सा रंगलेला दिसून आला.
Congress News : Vijay Wadettiwar On Congress Politics :
Congress News : Vijay Wadettiwar On Congress Politics : Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आपल्या समर्थक आमदारांसह ते सत्तेत सहभागी झाला. यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडे विरोधीपक्षनेतेपद चालून आले. त्यानुसार विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची निवड झाली. मात्र वडेट्टीवारांच्या निवडीवरून अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा होतात. काँग्रेस पक्षांतर्गतसुद्धा यावर अधून-मधून चर्चा सुरू असते. (Latest Marathi News)

Congress News : Vijay Wadettiwar On Congress Politics :
Kolhapur NCP News : शरद पवारांची खेळी; 'मविआ'कडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरणार..?

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात नुकताच पार पडलेल्या एका सत्कार सोहळ्यात विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीचा मजेदार किस्सा रंगलेला दिसून आला. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवारांच्या पदासंबंधी भाष्य केले. यानंतर वडेट्टीवारांनी धानोरकर यांना वेगळ्याच शैलीत उत्तर दिल्याने, सभागृहात एकच हशा पिकला.

या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षातून अनेक आमदार रिंगणात होते. मी देखील एका इच्छुकाला हे पद मिळावे, यासाठी प्रयत्न करत होते. मात्र वडेट्टीवार यांनी हायकमांडकडून पद कसे आणले ? हे माझ्यासकट अनेक आमदारांना अजून समजले नसल्याची कबुली त्यांनी दिली.

Congress News : Vijay Wadettiwar On Congress Politics :
Vijay Wadettiwar Opposition Leader : विजय वडेट्टीवार अखेर विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत बसले

आमदार धानोरकर यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी प्रतिस्पर्धी इच्छुकाच्या समर्थक आमदार यादीत माझे स्वतःचे समर्थक आमदार होते, असा खुलासा करताच सभेत एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com