Mumbai News : विधीमंडळ अधिवेशनाच्या सूप वाजण्याआधीच्या आदल्या दिवशी म्हणजे, गुरुवारीअखेर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार बसले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वडेट्टीवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. वडेट्टीवार हे जुने शिवसैनिक ते काँग्रेसमधील लढणारे, भिडणार नेते असल्याचे सांगून सर्वपक्षीयांनी त्यांचे कौतुक केले. (Latest Political News)
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर विरोधातील महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रसेचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षांना विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्त करण्याचे पत्र दिले होते. यानुसार वडेट्टीवार यांची गुरुवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. अधिकृत घोषणा होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर मंत्री आणि आमदारांनी वडेट्टीवारांचे अभिनंदन करत स्वागत केले.
विरोधी पक्षनेते पदाची घोषणा करताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, अजित पवारांनी राजीनामा दिल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. थोरातांनी दिलेल्या पत्रानुसार आणि काँग्रेस विधानसभेचा विरोधी पक्षनेते पदाचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने आज ३ ऑगस्ट २०२३ रोजी वडेट्टीवार यांची निवड करत आहोत. आता त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून असलेल्या सर्व सुविधा मिळतील. त्यांनी आपल्या खुर्चीत बसावे. "
यानंतर नार्वेकरांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गटनेते आणि इतरांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचे प्रथेप्रमाणे स्वागत करण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी वडेट्टीवारांच्या हाताला धरूनच सर्वांसमोर आणले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिंदे म्हणाले, "जो विरोधी पक्षनेता होतो तो भविष्यात मुख्यमंत्री झाल्याची अनेक उदाहरणे राज्यात आहेत."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.