Devendra Fadnavis On OBC: ओबीसी समाजाच्या समस्या सरकार सोडवणार; फडणवीसांनी सांगितला 'प्लॅन'

OBC News: ओबीसी समाजातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून १० लाख घरकुलं तयार करण्यात येणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: आरक्षण अबाधित राखण्यासाठी आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाला खूष करण्यासाठी राज्य सरकार सरसावले असून, ओबीसी समाजासाठी असणाऱ्या सरकारच्या योजनांना आता गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी शासन काय निर्णय घेत आहे, तसेच काय निर्णय घेणार आहे, याची माहिती दिली.

ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारचं काम सुरू आहे. या समाजासाठी असलेली वसतिगृह लवकरच सुरू करण्यात येणार असून, स्वाधार योजनेतून समाजातील नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे. ओबीसी समाजातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून १० लाख घरकुल तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis
Amit Deshmukh On Cabinet Meeting : मराठवाड्याला काही द्यायचेच नव्हते, तर मग बैठक घेतली कशाला ? अमित देशमुख भडकले..

ओबीसी समाजाच्या समितीची बैठक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुंबईत घेण्यात येणार आहे. या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर व समस्यांवर चर्चा करण्यात येईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. जर सरकार कुठं चुकलं तर समाजातील नेत्यांनी ते सांगावे, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.

कंत्राटी पद्धतीने भरतीबाबत अफवा पसरविण्यात येत आहेत. कोणत्याही विभागात सरसकट कंत्राटी भरती करण्याचा सरकारचा विचार नाही. काही ठिकाणी तात्पुरता उपाय म्हणून कंत्राटी नियुक्ती करण्यात आली. मात्र, सरकार जागा रिकाम्या ठेऊन कंत्राटी नोकर भरती करीत असल्याची बाब खोटी आहे, असेही फडणवीसांनी सांगितले. सर्व विभागांमधील १०० टक्के जागा योग्य पद्धतीने व नियमानुसार पारदर्शकपणे भरण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

आपण मुख्यमंत्री असताना 12 टक्के आरक्षण दिले तेच प्रामाणिकपणे मराठा समाजाला मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहोत. भोसले कमिटीने काही उपाययोजना सुचविल्या आहेत, त्यामुळे आरक्षण कोर्टात टिकेल.

न्यायमूर्ती शिंदे समिती अगोदर कुणबी असणाऱ्याची पडताळणी व सगळा अभ्यास करण्यासाठी नेमली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला तर तो कोर्टात टिकला पाहिजे, कोणत्याही समाजाला एकमेकांसमोर उभे करायची भूमिका सरकारची नसल्याचे फणडवीसांनी स्पष्ट केले.

आपण मुख्यमंत्री असताना 26 वेगवेगळ्या योजनांचे जीआर काढले होते. काही जीआरवर काम होण्याची गरज असून, ओबीसी हॉस्टेलसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जागा शोधत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासाठी निधी दिला. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. या समाजावर अन्याय होणार नाही, असा शब्द फडणवीसांनी या वेळी दिला.

Edited by - Ganesh Thombare

Devendra Fadnavis
NCP News: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांनी घातलं लक्ष; तुषार कामठेंवर सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com