NCP News: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांनी घातलं लक्ष; तुषार कामठेंवर सोपवली मोठी जबाबदारी

Sharad Pawar New Office Pimpri-Chinchwad : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार तयारी; तुषार कामठे यांची पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती
Pimpri-Chinchwad NCP
Pimpri-Chinchwad NCPSarkarnama

Pimpri News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवडते शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या पक्षाला टक्कर देण्यासाठी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोठी तयारी सुरु केली आहे. त्यांचे नवे कार्यालय सज्ज झाले असून गणेशोत्सवानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याआधीच आता तुषार कामठे यांची पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

गत टर्मला २०१७ ला प्रथमच भाजपकडून नगरसेवक झालेले व यावर्षी १८ फेब्रुवारीला राष्ट्रवादीत आलेले तुषार कामठे यांच्यावर आता पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षाच्या पुणे शहर मासिक बैठकीला शुक्रवारी पाटील आले होते. त्यावेळी रावेत येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांनी कामठे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्यासह शहराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यानंतर या नियुक्तीला वेग मिळाला आणि नियुक्तीही जाहीर करण्यात आली.

कामठे हे अभ्यासू, तरुण आणि आक्रमक चेहरा आहेत. पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप म्हणजे स्वपक्षाच्या चुकीच्या कामांनाही त्यांनी विरोध केला होता. आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरुद्ध उभे राहण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. शहर कारभाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून डावलले गेलेल्या व पाच वर्षात एकही पद न मिळालेल्या कामठेंनी १५ फेब्रुवारीला भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर तीनच दिवसांत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

दुसरीकडे शरद पवार गट आपले शहर कार्यालय लवकरच सुरु करणार आहे. काळेवाडीत त्याच्या तयारीवर शेवटचा हात फिरवला जात असून गणेशोत्सवानंतर प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते त्याचे ओपनिंग करण्यात येणार असल्याचे शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले. त्यानिमित्त पक्षाचा मेळावाही घेणार असून त्याकरिता शरद पवारांनाही बोलावण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

यावर्षी दोन जुलैच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर उद्योगनगरीतील आमदारासह बहुतांश पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अजित पवारांची साथ धरली. त्यामुळे पक्षाचे शहरातील कार्यालय त्यांच्याकडे राहिले. त्यावर शरद पवार गटाने दावा न करता नवे कार्यालय त्यांनी सुरु करायचे ठरविले आहे.

Edited by - Ganesh Thombare

Pimpri-Chinchwad NCP
Jitendra Awhad On Shasan Aplya Dari: 'शासन आपल्या दारी अन् महाराष्ट्र झाला भिकारी'; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com