चिन्ह गोठवलं; शिवसैनिकांचं सळसळणारं रक्त कसं गोठवणार?

शिवसैनिकांच्या नसानसांत सळसळणारं रक्त कसं गोठवणार, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र (Maharashtra) राज्य एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी दिली आहे.
Vijay Malokar, Maharashtra ST Sena
Vijay Malokar, Maharashtra ST SenaSarkarnama

अकोला : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनासुद्धा शिवसेनेचे चार अक्षरी नाव वापरता येणार नाही असा निर्णय दिला. या देशात खरच लोकशाही जिवंत राहिली का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बरं चिन्ह गोठवलं, पण शिवसैनिकांच्या नसानसांत सळसळणारं रक्त कसं गोठवणार, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र (Maharashtra) राज्य एसटी (S.T.) कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी दिली आहे.

राजकीय पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व अबाधित राहिले तर लोकशाही टिकणार आहे. पैसा आणि पाॅवरच्या जोरावर कोणीही जर लोकांनी निवडून दिलेले सरकार अगदी सहज पाडू शकत असतील, खोके घेणारे गद्दारच मूळ पक्षावर दावा करू शकत असतील, लोकांच्या मतांवर निवडून येणारे दिवसाढवळ्या विकले जात असतील, न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधून घेतली असेल, संविधानाने स्वतंत्र अधिकार दिलेल्या देशाच्या स्वायत्त संस्था दबावात काम करत असतील. तर कशाला लोकशाहीचं थोतांड मांडलं? एकदाच हुकूमशाही जाहीर करून टाकावी, असे मालोकार म्हणाले.

पक्षातून हकालपट्टी केलेले, अपात्रतेची टांगती तलवार असताना, सर्वोच्च न्यायालयात (Suprime Court) प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पक्षाशी गद्दारी करणारे लोकप्रतिनिधी मूळ पक्षावर दावा कसे करू शकतात? निवडणूक आयोगसुद्धा अप्रत्यक्ष त्यांची बाजू घेत असेल तर हा राजकीय पक्षाच्या अस्तित्वावर सर्वात मोठा आघात असल्याचे मालोकार म्हणाले. पक्षाची घटना, पक्ष प्रमुखांचे अधिकार, पक्षाची रचनात्मक बांधणी, याला काहीच महत्त्व शिल्लक राहणार नाही.

देशात जे काही चालू आहे त्याला आळा घालण्याची जबाबदारी आता जनतेला पार पाडावी लागणार आहे. अन्यथा जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळेल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. देशातील लोकशाही अस्तित्वाच्या संघर्षाची मशाल महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक पेटवतील. ही लढाई निव्वळ एका पक्षाची नसून, १३० कोटी जनतेच्या स्वातंत्र्याची आहे. ही जबाबदारी शिवसैनिकांच्या खांद्यावर आहे, याची जाणीव प्रत्येक शिवसैनिकाला आहे, असे मालोकार म्हणाले.

Vijay Malokar, Maharashtra ST Sena
'आता मात्र अती झालं', उद्धव ठाकरे कडाडले

पुन्हा भरारी घेवू..

पैसा आणि सत्ता या जोरावर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, शिवसेनेसमोर जेवढे संकटं उभे कराल, तेवढ्या जोमाने शिवसेना पुन्हा भरारी घेणार, यात तिळमात्र शंका नाही. तुम्ही फक्त चिन्ह गोठवलं, पण देशातील तमाम शिवसैनिकांच्या नसानसांत संचारणारं सळसळत रक्त कसं गोठवणार, असा सवाल एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com