Bhandara जिल्ह्यात अंतर्गत वादात पिछाडीवर गेली भाजप, सत्तेचा प्रभाव दिसला नाही...

BJP : जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत वादाचा फायदा इतर पक्षांनी उचलत आपले ध्येय साध्य केले आहे.
Yavatmal
YavatmalSarkarnama

Grampanchayat Election Results Analysis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे भंडारा जिल्ह्यावर विशेष लक्ष असतानासुद्धा भंडारा जिल्ह्यात भाजपची जादू चालली नाही. जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत वादाचा फायदा इतर पक्षांनी उचलत आपले ध्येय साध्य केले आहे.

दरम्यान भंडारा (Bhandara) जिल्ह्यात काँग्रेस समर्थीत उमेदवारांनी बाजी मारली असून १२४ ग्रामपंचायती जिंकत कॉंग्रेस जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष झाला असल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. तर भाजप ८३ ग्रामपंचायती मिळवत दोन नंबर आहे. दरम्यान तुमसर येथे भाजपच्या असलेल्या ग्राम पंचायतीवर भाजपमधून निष्कासीत केलेले माजी आमदार चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशनने दावा केला आहे, हे खरे ठरल्यास भाजपची आकडेवारी अजून कमी होऊ शकणार आहे. दुसरीकडे भाजप खासदार सुनील मेंढे आपल्या मूळ गावी तोंडघशी पडले आहेत. तेथे राष्ट्रवादीचे घड्याळ आले असून निकिता कोरे सरपंच झाल्या आहेत. आता भंडारा जिल्ह्यात भाजपकडे इतकी मोठी फौज असतानासुद्धा असमाधानकारक कामगिरी केल्याने भाजपला मंथन करण्याची वेळ आली आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस १२४, भाजप ८३, राष्ट्रवादी ३९, शिंदे गट १३, ठाकरे गट ४ व अपक्ष ४२ ग्रामपंचायतींवर निवडून आले आहेत. ही आलेली आकडेवारी बघितल्यास कॉंग्रेस वगळता इतर पक्षांना मंथन करण्याची गरज आहे. १५व्या वित्त आयोगावरून सरपंचपदाला अधिक महत्व असल्याने नेत्यांचे लक्ष ग्रामपंचायतींवर होते. आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने हे अपयश त्यांच्या नावावर टाकले जात आहे. त्यामुळे यंदा भंडारा जिल्ह्यात भाजप अधिक ग्रामपंचायती बळकावेल, अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता असतानासुद्धा भाजप समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. याला भंडारा जिल्ह्यातील भाजपचा अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते जिल्हाध्यक्षावर नाराज आहेत. अनेक जागी खात्रीने निवडून येणाऱ्या उमेदवाराला डावलून कमकुवत उमेदवार दिले गेले. गणेशपुरची निवडणूक त्याचे उत्तम उदाहरण आहे. दुसरीकडे पक्षाकडून आलेले नियोजनाचे धडे पाळले गेले नाही. सक्षम उमेदवाराला न निवडता कमकुवत उमेदवाराला संधी दिली गेली. आपल्या आवडीचे नाही म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला गेला. लाखनी, साकोली तालुक्यात याच प्रकाराने अनेक बळी गेले आहेत. दरम्यान आता तर जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांचा वाद अधिक वाढला असून जिल्हाध्यक्ष बदलवण्यासाठी आंदोलन झाले तर नवल वाटायला नको. दरम्यान लाखनी, पवनी, आणि भंडारा तालुक्यात भाजपला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी च्या घड्याळाला चाबी मारण्याचीही गरज आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी ३९ ग्रामपंचायत बळकावू शकली आहे.

Yavatmal
Akola जिल्ह्याची राजकीय दिशा ठरविणारी निवडणूक, ‘वंचित’ने मतदार जोडला...

जेव्हापासून राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले, तेव्हापासून घड्याळाचे काटे संथ झाले आहेत. राष्ट्रवादीचे इतर नेते भाईजींवर भिस्त ठेवून आपआपल्या व्यवसायात खूश आहेत. पक्ष वाढीसाठी विशेष अशी कामगिरी अद्याप या नेत्यांकडून झाल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीची प्रत्येक निवडणुकीत होत असलेली पीछेहाट त्याचेच द्योतक आहे. तुमसर तालुका वगळता राष्ट्रवादी इतर तालुक्यात कमी झाली आहे. भंडारा जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांची आपसी चढाओढ सुरू आहे. यंदा निवडणुकीत शिंदे गट आपली विशेष कामगिरी करू शकला नाही. केवळ १३ ग्रामपंचायती मिळवत शिंदे गटाने समाधानकारक कामगिरी केली आहे. तर ठाकरे गटाने ४ ग्रामपंचायतींवर ताबा मिळवत ‘हम भी है जोश में...’ म्हणत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. एकप्रकारे ग्रामपंचायत निवडणूक ठाकरे गटाला लकी ठरली आहे.

दुसरीकडे तुमसरमध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशनने या निवडणुकीत खाते उघडले आहे. १३ ग्रामपंचायतींवर सरळ कब्जा केला आहे. तर इतर पक्षासोबत हातमिळवणी करून विकास फाउंडेशन ने ३५ ग्रामपंचायतींवर आपली दावेदारी ठोकली आहे. त्यामुळे तुमसरमध्ये भाजप आणि विकास फाउंडेशनमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. सर्व पक्ष अनेक ग्रामपंचायती वर आपले दावे करीत आहेत. पुढील काळात ते हळूहळू स्पष्ट होत आहे. एकंदरीतच यंदाची ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार ठरली आह

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com