भोयर ऐवजी देशमुखांना पाठिंबा! नागपुरात कॉंग्रेसच्या नामुष्कीचे असे रंगले नाट्य!

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
Chotu Bhoyar
Chotu BhoyarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत कॉंग्रेस आपला अधिकृत उमेदवार बदलणार, अशा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून झडत होत्या. भाजपचे नेते (BJP) आत्मविश्‍वासाने सांगत होते, तर कॉंग्रेसचे (Congress) नेते ही चर्चा खोडसाळ असल्याचे सातत्याने सांगत आले. पण आज अखेर ‘ते’ बहुप्रतिक्षीत पत्र नागपुरात (Nagpur) पोहोचले. अन् कॉंग्रेसचे नेते तोंडघशी पडले. तसे वृत्त 'सरकारनामा'ने कालच दिले होते.

निवडणूक घोषित झाल्यानंतर कॉंग्रेसने घोषित केलेले भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर हे निवडणूक लढण्यास अनुत्सुक असल्याचे कारण पुढे करीत त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला उमेदवार घोषित केले आहे. तसे पत्र महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना पाठवण्यात आले आहे. हे पत्र नागपुरात धडकताच कॉंग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की आल्याची चर्चा सुरू झाली.

Chotu Bhoyar
नाना पटोलेंनी हमी घेतलेले भोयर यांची शांतता अन् राष्ट्रवादीचा संभ्रम...

काय म्हटलंय पत्रात..

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रवींद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी मतदान होत आहे. मात्र आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रवींद्र भोयर यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी आपण असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच मा. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यासंदर्भात माहिती देण्यात यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com