Ramtek Constituency: रामटेकमध्ये राजू पारवेंचा कुणी केला 'करेक्ट कार्यक्रम'?

Ramtek Lok Sabha Constituency Raju Parve was Defeated by Shyamkumar Barve: रामटेक मतदारसंघात तीन आमदार आणि प्रदेशाध्यक्ष असतानाही माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजप तसेच महायुतीचा करेक्ट केला.
Raju Parve
Raju ParveSarkarnama

Ramtek Lok Sabha Constituency Result: तीन आमदार आणि प्रदेशाध्यक्ष असतानाही माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजप तसेच महायुतीचा करेक्ट केला. त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे आघाडी मिळवून दिली. कामठी हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ते सलग तीन वेळा निवडूण आले होते. राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्रीसुद्धा ते होते.

सध्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून ते विधान परिषदेचे आमदार आहेत. कामठी येथे भाजपचे टेकचंद सावरकर आमदार आहेत. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या विजयाची गॅरंटी बावनकुळे यांनी घेतली होती. किंबहुना त्यांना भाजपचा उमेदवार करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न त्यांनीच केला.

याच मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जाहीर सभाही झाली. हे बघता पारवे यांना सर्वाधिक मताधिक्य कामठी देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात महायुतीचे राजू पारवे कामठीत 17 हजार 543 मतादांनी पिछाडीवर आहेत. याच कामठीने मागील निवडणुकीत तुमाने यांना 24 हजार 464 मतांची आघाडी दिली होती.

हिंगणा मतदारसंघ सुमारे दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. आमदार समीर मेघे यांनी येथे चांगलाच जम बसवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खच्चीकरण केले आहे. असे असतानाही पारवे हिंगण्यातून 17 हजार ८६२ मतांनी मागे आहे. रामटेकमध्ये शिंदे सेनेचे आशिष जयस्वाल आमदार आहेत. यापूर्वीसुद्धा ते तीनवेळा आमदार होते. शिंदे सेनेचा उमेदवार म्हणून पारवे यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून मोठी आशा होती. ती फोल ठरली. 4 हजार 668 मतांनी ते येथे माघारले आहे.

Raju Parve
Beed Lok Sabha Constituency : विजयाचा गुलाल घेऊनच बजरंग बाप्पांनी घेतली जरांगे पाटलांची भेट..

राजू पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. येथून तरी ते आघाडीवर राहतील अशी अपेक्षा होती. मात्र ते स्वतःलाही आपल्याच मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देऊ शकले नाहीत. तब्बल 14 हजार 879 मतांनी ते येथे पिछाडीवर आहेत. सावनेर हा सुनील केदारांचा बालेकिल्ला असून येथून त्यांना मताधिक्य मिळण्याची शक्यताच नव्हती. येथून आघाडीचे बर्वे यांना 16 हजार 609 मतांची आघाडी आहे. अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातूनही पारवे यांना 5 हजार 108 मतांचा फटका बसला आहे.

महाआघाडीचे मताधिक्य (2024)

काटोल - 5108

सावनेर - 16,609

कामठी - 14,534

हिंगणा - 17, 862

रामटेक - 4668

उमरेड - 14,879

एकूण मताधिक्य - 76,660

युतीचे मताधिक्य (2019)

काटोल- 22,203

सावनेर - 7456

कामठी - 24,464

हिंगणा - 25,919

रामटेक - 23,077

उमरेड - 22,970

एकूण - 1,26,089

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com