Beed Lok Sabha Constituency : विजयाचा गुलाल घेऊनच बजरंग बाप्पांनी घेतली जरांगे पाटलांची भेट..

Bajrang Sonwane Meet Manoj Jarange Patil : बीड मतदारसंघात मुंडे बहीण-भावाने राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली, पण अखेर त्यांनी विजयाची हनुमान उडी घेतलीच.
Bajrang Sonwane Meet Manoj Jarange Patil
Bajrang Sonwane Meet Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखने

Jalna News : लोकसभेच्या बीड मतदारसंघात झालेल्या हाय होल्टेज लढतीनंतर महायुतीच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंगबाप्पा सोनवणे यांनी साडेसहा हजार मतांनी पंकजा यांना धुळ चारली. अनेक वाद-आरोप-प्रत्यारोप आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशा टोकाच्या संघर्षाने बीडची निवडणूक राज्यभरात गाजली.

अखेर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पठ्ठ्याने विजयाचा गुलाल आपल्या कपाळी लावला आणि रात्रीत अंतरवाली सराटी गाठली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात विशेषतः मराठवाड्यात निर्माण झालेल्या महायुती सरकारविरोधातील सुप्त लाटेचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झाला. बीड मतदारसंघात मुंडे बहीण-भावाने राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली, पण अखेर त्यांनी विजयाची हनुमान उडी घेतलीच.

मराठा समाज सोनवणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आणि बीडमध्ये महायुतीचा दारूण पराभव झाला. याबद्दल मनोज जरांगे पाटील (Bajrang Sonwane) यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बजरंग सोनावणे मंगळवारी ( ता.4) जून रोजी रात्री अंतरवाली सराटी गाठले. विजयाच्या गुलालासह सोनवणे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.

भगवी शाल, गळ्यात हा घालून जरांगे पाटील यांनी बजरंगबाप्पांचे खासदार झाल्याबद्दल अभिनंदन केले. तर सोनवणे यांनी जरांगे यांच्या पाया पडत त्यांचे आभार व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर मंत्री धनंजय मुंडे, लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी जातीयवादाचा आरोप केला होता.

Bajrang Sonwane Meet Manoj Jarange Patil
Nitin Gadkari: नागपुरात गडकरींना फडणवीसांपेक्षा खोपडेच ठरले फायदेशीर

यावरून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप मध्यंतरीच्या काळात सुरू होते. 13 मे चे मतदान झाल्यानंतर आम्ही जातीयवादी झालो का? असा सवाल जरांगे पाटील यांनी या निमित्ताने उपस्थितीत केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये बजरंगबाप्पा सोनवणे यांचा विजय महत्वाचा ठरला.

राज्यात लोकसभा निवडणूक संपन्न झाली, ही निवडणूक समाजाने हातात घेतली होती. त्यामुळे त्यांनी ज्यांना निवडून आणायचे त्यांना आणले आहे व ज्यांना पाडायचे त्यांना पाडले. हा विषय समाजाचा होता मी कोणाचे नाव घेतले नाही, जे समाजाला योग्य वाटले ते त्यांनी केले आहे. जे खासदार निवडून आले ते नक्की आरक्षणाचा विषय लोकसभेत हातळतील, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी सोनवणे यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Bajrang Sonwane Meet Manoj Jarange Patil
Sandipan Bhumare : 'या' त्रिमूर्तींनी दिलं भुमरेमामांना लीड; पण मंत्र्यांच्या मतदारसंघात पिछेहाट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com