Buldhana : एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा कळस.. धावत्या एसटीची दोन चाके निखळली

MSRTC : शेगाव आगारचा गलथान कारभार; 70 प्रवासी थोडक्याच बचावले
MSRTC Bus Meets Accident Near Shegaon.
MSRTC Bus Meets Accident Near Shegaon.Sarkarnama
Published on
Updated on

Shegaon : सुमारे 70 प्रवाशांना घेऊन जळगाव जामोदकडे भरधाव जात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची दोन चाके निखळली. बसच्या चालकाने समयसूचकता दाखविली नसती तर एसटी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता. बुलढाणा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. बसमधील प्रवास यात जखमी झाले आहेत.

शेगाव आगाराची बस (MH28-8712) जळगाव जामोदकडे मार्गस्थ होती. कालखेड गावाजवळ बस आली असता धावत्या बसचे मागील दोन चाके निखळली. काही अंतरापर्यंत ही बस तशीच धावत होती. चालकांच्या ही बाब लक्षात येताच त्याने प्रसंगावधान दाखवित बसवर नियंत्रण मिळविले व ती कशीबशी रोखली.

MSRTC Bus Meets Accident Near Shegaon.
Buldhana Politics : बुलढाणा तापलं; एकाच गावात राहणाऱ्या तुपकर अन् आमदार गायकवाडांमध्ये जुंपली

गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा शेगाव एसटी आगार प्रशासनाचे काही ना काही प्रताप पुढे येत आहेत. यातील काही प्रसंग तर प्रवाशांच्या जीवावर बेतणारे ठरू शकतात. अशात शनिवारी (ता. 23) घडलेल्या घटनेने तर एसटीचा प्रवास खरोखर सुरक्षित आहे काय, असा प्रश्नचिन्ह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनावर लावला आहे. भरगच्च बसला अपघात झाला असता तर या अनर्थाला कोण जबाबदार असते असा प्रश्न आता उपस्थित होते आहे.

बसचे मागील दोन चाके निखळल्यानंतर ही बस उलटणार होती. दुसरे चाकही निघून पडणार होते. चाके निघताच बसला मोठा अपघात घडला असता. बसमधून प्रवास करणाऱ्या कुणालाही याची किंचितही कल्पना नव्हती की असा अपघात त्यांच्यासोबत घडणार आहे. अशात चालकाने बसला नियंत्रित केली नसती तर काय झाले असते याची कल्पना करूनच अंगाचा थरकाप उडतो. घटनेनंतर चालक आणि वाहकाने शेगाव आगारातून तातडीची मदत मागविली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कालखेड फाट्याच्या आसपास पोहोचल्यानंतर अचानक बसचे अॅक्सेल तुटले. त्यामुळे बसचे मागील दोन्ही चाके निखळली. चाके निखळताच बस जागेवरच थांबली. मात्र चालकाने तत्काळ बसवर ताबा मिळविला. सुदैवाने या अपघातात प्रवाशाला किरकोळ दुखापत झाले. कोणत्याही भरधाव वाहनाचे अ‍ॅक्सेल तुटल्यानंतर वाहनांचा भयंकर अपघात घडल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

शेगाव आगारासह महाराष्ट्रातील अनेक आगारांमधील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस भंगार झाले आहेत. मात्र तरीही त्यातून प्रवासी वाहतूक सुरू आहे. अनेकदा महामंडळाच्या बसेस रस्त्यात बंद पडता. पूर्व विदर्भात तर बसचे छप्परच उडून गेले होते. विशेष म्हणजे महामंडळातील बहुतांश भंगार बसेस विदर्भात सर्रासपणे वापरात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भात नवीन बसेस आलेल्या नाहीत. शेगाव आगाराच्या चालक व वाहकांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांमध्ये जुन्या बसेसबाबत तक्रार केली होती.

Edited by : Prasannaa Jakate

MSRTC Bus Meets Accident Near Shegaon.
Buldhana : सरकारला आता शेतकऱ्यांचा इंगा दाखवणार, विधान भवनावरच धडक देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com