इंदूरीकरांनी दिला शाप; 'त्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील...'

Nivrutti maharaj Indurikar इंदुरीकर महाराजांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Nivrutti maharaj Indurikar News |Nivrutti Maharaj News |Indurikar Maharaj News |Indorikar Maharaj latest news
Nivrutti maharaj Indurikar News |Nivrutti Maharaj News |Indurikar Maharaj News |Indorikar Maharaj latest news

अकोला : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti maharaj Indurikar) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अकोल्यात एका किर्तनावेळी इंदूरीकरांची जीभ घसरल्याची चर्चा सुरु आहे. यावेळी इंदूरीकरांनी युटुबर्सवर हल्ला चढवला आहे. 'माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स तयार करुव यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने किर्तनकार इंदूरीकरांनी केले आहे. (Controversial statement of Indurikar Maharaj latest news)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील कौलखेड भागातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी किर्तनकार इंदुरीकर महाजारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. किर्तन करताना निरुपणावेळी इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका केली आहे. मात्र यावेळीही त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले आहेत. (Indurikar Maharaj News Updates)

Nivrutti maharaj Indurikar News |Nivrutti Maharaj News |Indurikar Maharaj News |Indorikar Maharaj latest news
प्रभागरचनेचे अधिकार निवडणूक आयोगाकडेच असावे

''माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ शेअर करून हजारो युट्यूबर्सनी कोट्यावधी रुपये कमावले. पण माझ्याच कीर्तनाच्या क्लिप बनवून मलाच न्यायालयात उभे केले. त्यांचे वाटोळच होणार. त्यांच चांगले होणार नाही, माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. या कीर्तनावेळीही त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना अनेकदा त्यांनी हटकले. व्हिडिओ न काढण्यास अनेकदा सांगितले. पण संपूर्ण कीर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून येत होता.

खरं तर इंदुरीकर महाराजांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांनी महिलांंबाबत अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. २०२० मध्ये, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते.

लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यामुळे इंदूरीकर चांगलेच अडचणीत आले होते. जिल्हा आरोग्य विभागाने इंदूरीकरांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना दिलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी इंदूरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com