API Manoj Landge : अतिमहत्त्वाच्या काळात रजा घेणे सहाय्यक पोलिस निरीक्षकाला भोवले

IPS Bachan Singh : अकोल्यातील मनोज लांडगे शासकीय सेवेतूनच निलंबित
API Manoj Lande
API Manoj LandeSarkarnama
Published on
Updated on

Akola Police : अतिमहत्त्वाच्या काळात रजा घेणे एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला (API) थेट शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ही कारवाई केली आहे. मनोज लांडगे असे निलंबित करण्यात आलेल्या एपीआयचे नाव आहे.

लांडगे अकोला पोलिस दलातील सीएमएस सेलमध्ये कार्यरत आहेत. प्रकृती बरी नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. मात्र याबाबत कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे. या कारवाईमुळे अकोला पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

API Manoj Lande
NCP Politics : अकोल्यात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘लेटरबॉम्ब वॉर’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान जालना ते मुंबई संभाव्य पायदळ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. त्यामुळे 20 जानेवारी ते 28 जानेवारीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या.

सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज लांडगे हे अतिमहत्त्वाच्या सीएमएस सेल अकोला येथे नेमणुकीत असताना 5 जानेवारी ते 10 जानेवारीदरम्यान अचानक किरकोळ रजेवर गेले. सुट्या रद्द असताना कर्तव्यावर त्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याचे नमूद करीत लांडगे यांनी मोबाईलवरून अधिकाऱ्यांना कळविले. रजेनंतर त्यांनी औषधोपचार संबंधात कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याचे निर्दशनास आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रजेबाबत वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना लांडगे यांनी दिली नव्हती. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या काळात गैरहजर राहणाऱ्या एपीआय मनोज लांडगे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवण्यात आला. यासंदर्भात चौकशी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मुंबई पोलिस (शिक्षा व अपिले) नियम 1956 नुसार एपीआय लांडगे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. निलंबन काळात त्यांना पोलिस नियंत्रण कक्ष अकोला येथे दररोज दोन्ही वेळच्या गणनेत उपस्थित राहावे लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

एपीआय मनोज लांडगे यांना अतिमहत्त्वाच्या काळात रजेवर गेल्याने निलंबित करण्यात आल्याचा घटनेनंतर पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोला जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच अशा प्रकारची पहिलीच कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. येणारा काळ हा निवडणुकीचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस सक्रिय झाले आहेत. ठराविक दिवसांनंतर सातत्याने अकोला पोलिस शहरातील संवेदनशिल भागातून ‘रूटमार्च’ काढत आहेत. त्यामुळे पोलिसांवर सध्या किती ताण आहे, याची कल्पना येते.

Edited By : Prasannaa Jakate

API Manoj Lande
Akola : IPS बच्चन सिंग, जिथे गेले ठरले ‘किंग’; अकोल्यात गुन्हेगारांची उतरविणार का झिंग?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com