Akola : IPS बच्चन सिंग, जिथे गेले ठरले ‘किंग’; अकोल्यात गुन्हेगारांची उतरविणार का झिंग?

Bacchan Sing : धडाकेबाज कारवाईचा पूर्वइतिहास पाहता अकोलावासियांच्या अपेक्षा वाढल्या
Akola SP Bacchan Sing.
Akola SP Bacchan Sing.Sarkarnama
Published on
Updated on

IPS Officer : पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर बच्चन सिंग यांना सूत्रे स्वीकारून अवघे पाचच दिवस झाले आहेत. येताच त्यांनी अकोला जिल्ह्यात कामाचा धडाका सुरू केला आहे. अकोल्यात येण्यापूर्वीही बच्चन सिंग यांची कारकीर्द अनेक ठिकाणी गाजली आहे.

बच्चन सिंग 213 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ उत्तर प्रदेशातील आहेत. इलोक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरींग असलेले सिंग यांनी आयआयएम बेंगळुरू येथून मार्केटिंगमध्ये एमबीए देखील केले आहे. काही दिवस त्यांनी खासगी क्षेत्रामध्ये नोकरी केली. त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना यश मिळाले.

Akola SP Bacchan Sing.
Akola : आमदार म्हणाले; काय सांगता साहेब, माझ्या घराशेजारीच चालतो वरलीचा अड्डा!

सिंग यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी ठाणे ग्रामीण जिल्ह्यात पूर्ण झाला. त्यांची पहिली पोस्टिंग सहाय्यक पोलीस अधिक्षक (ASP) म्हणून पैठण जिल्ह्यात झाली. ऑगस्ट 2018 मध्ये पदोन्नती होत ते अप्पर पोलीस अधीक्षक झालेत. पदोन्नतीनंतर त्यांची खरी जोरदार कारकीर्द सुरू झाली. जळगाव जिल्ह्यात त्यांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी धडाकेबाज मोहिम राबविल्या. पुणे शहर उपायुक्त आणि पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त असताना त्यांनी महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास मार्गी लावला.

वाशिमचे पोलीस अधीक्षक आणि 2 जानेवारी 2024 पासून आता ते अकोला पोलिस अधीक्षक आहेत. जळगावात त्यांनी एमपीडीए कायद्याचा वापर करीत तब्बल 14 गुन्हेगारांना हद्दपार केले. पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सोबत घेत 30 जणांचे पथक तयार केले. युवकांच्या मदतीने त्यांनी गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविले. रात्रीच्या गस्तीसाठी ‘आरएफआयडी’ यंत्रणा कार्यान्वित केली. त्यातून गस्तीवरील पोलिस नेमका कुठे आहे, याची माहिती त्यांना मोबाईलवरच मिळायची.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यात त्यांनी भरोसा सेलच्या माध्यमातून वर्षभरात 2 हजार 73 प्रकरणांना प्राधान्य दिले. त्यापैकी 807 प्रकरणात पती आणि पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण झाला. महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या 1 हजार 229 मजनुंवर त्यांनी थेटा कारवाई केली. ज्येष्ठ नागरिकांसाठीही ते मदतीला धावले. सप्टेंबर 2021 वाशिमचे एसपी झाल्यानंतर या छोट्याशा जिल्ह्यात बच्चन सिंग यांचे नाव गाजले. पश्चिम विदर्भातील वाशिम हा त्या तुलनेले शांत जिल्हा मानला जातो. कायदा व सुव्यवस्था, राजकीय दृष्टीनेही हा जिल्हा त्या तुलनेत शांत आहे.

बच्चन सिंग यांनी वाशिममध्ये अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रलंबित गुन्ह्यांचा तपास मार्गी लावला. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे त्यांनी उघडकीस आणले. संवेदनशील गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात त्यांच्यामुळे यंत्रणेला यश आले. जऊळका हद्दीतील शिक्षकाची जाळून हत्या, शेतकऱ्याची हत्या, बोराळा उपसरपंच हत्या, अनसिंग हद्दीतील खून प्रकरणातील आरोपींना गुन्हा घडल्यापासून 36 तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना त्यामुळे यश आले.

Akola SP Bacchan Sing.
Akola Police : अवैध धंद्यांवरुन एकाच वेळी सत्ताधारी, विरोधी पक्षातील आमदारांचा ‘लेटरबॉम्ब’

वाशिम शहरातील बाल लैंगिक गुन्हे प्रकरणातील आरोपीस कन्याकुमारीतून अटक झाला. वाशिममधील दरोडा व जबरी चोरीच्या घटनांमध्ये घट झाली. शिरपूर येथे इंस्टाग्राम पोस्टवरून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मध्यंतरीच्या काळात सोशल मीडिया पोस्टवरून दंगली घडविण्याचा ‘पॅटर्न’च सर्वत्र पसरला होता. बच्चन सिंग यांनी याप्रकरणातील आरोपी सायबर सेलच्या मदतीने तत्काळ गजाआड केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

सामाजिक शांतता बिघडवू पाहणाऱ्या वाशिममधील 11 घटनांमध्ये त्यांनी गुन्हा दाखल करून 14 आरोपींना अटक करायला लावली. ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवित 27 फरार आरोपींना शोधून काढायला लावले. 2 हजार 298 पेक्षा जास्त आरोपींना यातून अटक करण्यात आली. बाहेरील राज्यातून 47 आरोपी, इतर जिल्ह्यातून 347 आरोपी पकडण्यात आलेत.

Akola SP Bacchan Sing.
Akola : अल्पवयीन चुलतभावानेच भावासोबत केले असे कृत्य की, अख्खे शहरच हादरले

अकोल्यात 2 जानेवारीला सूत्रे घेताच बच्चन सिंग कामाला लागले आहेत. त्यांनी येताच कारवाईचा धडका सुरू केला आहे. अकोलेकरांना पोलिसांची नाकाबंदी या शब्दाचा विसरच पडला होता. सिंग यांनी पदभार स्वीकारताच नाकाबंदी सुरू केली आहे. वाहन तपासणीवरही जोर दिला जात आहे. शहरातील अवैध गुटखा व पानमसाला विक्री 3 जानेवारीपासून थांबली आहे. पिंजर येथील सात वर्षीय चिमुकल्याच्या हत्या प्रकरणाचा काही तासातच छडा लागला. यात मृत बालकाच्या चुलत भावाला अटक करण्यात आले. पाच वर्षीय बालिकेच्या अपहरणाचे प्रकरण बच्चन सिंग यांनी एका ‘लेडी ऑफिसर’कडे सोपवायला सांगितले. 36 व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून काही तासात अपहरण करणारी महिला व बालिकेपर्यंत पोलिस पोहोचले.

अकोल्यात महिला व तरुणींच्या छेडखानीचे प्रमाण मोठे आहे. कोचिंग क्लासेसची संख्या प्रचंड असल्याने येथे हे प्रकार चालतात. काही वर्षांपूर्वी अकोल्यात एका अल्पवयीन प्रेमी युगुलाची नृशंस हत्या करण्यात आली होती. मृतक तरुणीवर सामूहिक अत्याचारही झाला होता. अकोल्यातील सायबर कॅफेंवर सर्रास अश्लील प्रकार सुरू आहेत. जिल्ह्यात जुगार, मटका, वरलीने डोके वर काढले आहे. भूखंड आणि घासलेट माफिया पुन्हा जातीय दंगल घडविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे विदर्भातील अत्यंत संवेदनशील शहर या आपल्या जुन्या ओळखीकडे पुन्हा वाटचाल करीत असलेल्या अकोल्याची परिस्थिती बच्चन सिंग कशी हाताळतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Akola SP Bacchan Sing.
SP Transfer : बच्चन सिंग अकोल्याचे, बारगळ अमरावती सीआयडीचे एसपी पण का...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com