‘त्या’ बसला काढायला लागले तब्बल २६ तास, चालकाचा मृतदेह दीड किलोमीटरवर...

बसमधील चालक Driver वाहकासह सहा व्यक्तींपैकी दोघांना वाचविण्यात यश आले तर उर्वरित चार जणांना आपला जीव गमवावा Four Dead लागला.
Bus Accident
Bus AccidentSarkarnama
Published on
Updated on

अरविंद ओझलवार

उमरखेड (जि. यवतमाळ) : नांदेड वरून नागपूरकडे जाणारी एस.टी. महामंडळाच्या घाटरोड नागपूर आगाराची बस काल दहागाव नाल्याच्या पुरात वाहून गेली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर बस पुरातून काढण्यासाठी तब्बल २६ तास लागले. बसचालकाचा मृतदेह घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर सापडला. त्यामुळे २६ तास हे शोधकार्य सुरू होते.

नांदेडवरून नागपूरला जाणारी हिरकणी बस दहागाव नाल्यावरून जात असताना आलेल्या पुरात काल सकाळी वाहून गेली होती. यामध्ये बसमधील चालक वाहकासह सहा व्यक्तींपैकी दोघांना वाचविण्यात यश आले तर उर्वरित चार जणांना आपला जीव गमवावा लागला. बस नाल्यात वाहून जात असताना तिथे उभ्या असलेल्या धाडसी युवकांनी सुब्रमण्यम शर्मा व शरद फुलमाळी या दोन प्रवाशांना वाचविले. त्यानंतर सायंकाळपर्यंत वाहक भीमराव नागरीकर, प्रवासी शेख सलीम शेख इब्राहिम, इंदल रामप्रसाद मेहत्रे यांचे मृतदेह कालच सायंकाळपर्यंत बसमधून काढण्यात आले होते.

चालकाचा मृतदेह न सापडल्यामुळे प्रशासनाचे रेस्क्यू ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री अंधार झाल्यामुळे बंद झालेले प्रयत्न परत सकाळी सुरू करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी सकाळी दहा वाजता बसला क्रेन आणि जेसीबीच्या साहायाने बाहेर काढले असता चालकाचा मृतदेह बसमध्ये आढळून आला नाही. त्यामुळे परत नाल्यामधून चालकाचा शोध घेतला असता घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर बंग यांच्या शेताजवळ चालक सतीश सुरेवार यांचा मृतदेह आढळून आला. काल सकाळी आठ वाजल्यापासून सुरू असलेले प्रशासनाचे प्रयत्न आज सकाळी दहा वाजता संपले.

Bus Accident
हिंगोली : शिवसेनेच्या हेमंत पाटील यांच्या विजयात उमरखेड मतदारसंघ राहिला निर्णायक

दरम्यान, काल मंगळवारी आमदार नामदेव ससाने, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, परिवीक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे, वाहतूक शाखा निरीक्षक खेडेकर, पोलिस निरीक्षक खडसे, तलाठी दत्तात्रेय दुकैवार हे प्रयत्नरत होते. तर महामार्ग पोलिस मदत केंद्र कोसदणी, जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यवतमाळ, पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी यांच्यासह स्थानिक उमरखेड व दहागाव येथील युवकांनी या संपूर्ण प्रयत्नात सहकार्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com