Jalna : जालना घटनेच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते सुनील कोल्हे व रावसाहेब देशमुख यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. "एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा दिल्या.
मलकापूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत महामार्ग पूर्ववत सुरू केला.
लातूर-उमरगा महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. किल्लारी मार्केट बंद करण्यात आले. "लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा राज्यात मंत्र्याना फिरू देणार नाही," असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मंत्री संजय राठोड हे बुलढाण्यातून येत असताना त्यांच्या गाडीच्या ताफासमोर टायर जाळून त्यांचा ताफा रोखण्यात आला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मराठा समाजातील कार्यकर्ते यांनी मेहकर तालुक्यातील हिवराश्रम येथे राठोड यांचा ताफा जवळपास अर्धा तास अडवून धरला होता. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.