Jalna Maratha Protest : ‘इंडिया’च्या बैठकीपासून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी केला लाठीचार्ज !

Nana Patole : कालची घटना म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Lathi charge on Maratha community protestors in Jalna : काल जालनामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर काल (ता. १) लाठीचार्ज झाला. हा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाने झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. कालची घटना म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. (Attempts to undermine democracy)

या सरकारने आधी मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखविले. तुम्ही मला सत्ता द्या, २४ तासांत तुम्हाला आरक्षण देतो, ही घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना लाठ्या खाव्या लागल्या. फडणवीसांना त्यांच्या सरकारच्या काळात चुकीचा कायदा आणला, त्यामुळं न्यायालयाने त्यांना फटकारले आहे.

उपोषण मंडपात लाठीचार्ज झाला, हे इतिहासात काल पहिल्यांदा झाले. काल (ता. १) ‘इंडिया’ची बैठक होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण आणि रॅली होती. ‘इंडिया’च्या गठणानंतर भाजप (BJP) नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कालच्या बैठकीपासून देशाचे लक्ष भरकटवण्यासाठी काल मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्यासाठी आता नवीन कायदा सरकार करणार आहे. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा, पोलिसांवर कारवाई करण्यापेक्षा ज्यांनी हा लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता काँग्रेस पक्ष मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढं येणार आहे. सर्व समाजांना न्याय देण्याची काँग्रेसची भूमिका आहे. बदमाश लोक सत्तेत बसले आहेत. त्यांना सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी आम्ही लढणार आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Nana Patole News : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा फक्त चेहरा ; देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम : नाना पटोलेंनी वात पेटवली

भ्रष्टाचार कोण करत आहेत, याचे उत्तर मोदींनी द्यावे. भ्रष्टाचाराचा पैसा कुणाकडे जात आहे, हेसुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. काल ‘इंडिया’च्या बैठकीत यावर चर्चा झाली. कॉंग्रेस आगीत तेल टाकण्याचे काम करत आहे, अशी टिका सत्ताधाऱ्यांनी केली. यावर काँग्रेसला आगीत तेल टाकण्याची गरज नाही. देशाला मोठं करण्याचे काम काँग्रेसने केलं आहे. आगीत तेल टाकण्याचं काम सत्ताधारी करत आहेत. सरकारच्या आदेशाने लाठीचार्ज झाला, याचे उत्तर सरकारने द्यावे.

राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली, याला सरकार जबाबदार आहे. हे जुमलेबाज सरकार आहे. संसदेचे विशेष अधिवेशन हीसुद्धा जुमलेबाजीच आहे. उद्यापासून राज्यातील सर्व तालुक्यांत जनसंवाद यात्रा काँग्रेसकडून काढली जाणार आहे. मी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथून यात्रेला सुरुवात करणार आहे. जुमलेबाज सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आणण्यासाठी ही यात्रा काढत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Nana Patole News : '' महाविकास आघाडीत जागा वाटपावरून स्पर्धा - वाद नाही, आमचा उद्देश... ; काँग्रेसच्या पटोलेंनी थेटच सांगितलं

या यात्रेमध्ये रोज २५ किलोमीटर आम्ही पायी चालणार आहोत. प्रत्येक ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले. या यात्रेतून भाईचारा वाढविण्याचे काम आम्ही करणार आहोत. ‘वन नेशन वन इलेक्शन’ला विरोध करण्याचे काही कारण नाही. मात्र EVM ला आमचा विरोध आहे. बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com