Nagpur Hemant Soren : झारखंड माओवाद मुक्तीच्या उंबरठ्यावर, सर्वांनाच फायदा

Jharkhand : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात दावा
Jharkhand CM Hemant Soren With Congress President Mallikarjun kharge at Nagpur.
Jharkhand CM Hemant Soren With Congress President Mallikarjun kharge at Nagpur.Sarkarnama

Visit For Congress Leader Avinash Pande's Function : झारखंड पूर्णपणे माओवाद मुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. राज्यात 16 जिल्ह्यांचा आतापर्यंत माओवाद प्रभाविताच्या यादीत समावेश होता. मात्र राज्य पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) राज्यातील माओवादाची समस्या दूर करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत, असा दावा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी केला.

झारखंडचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांच्या निमंत्रणावरून नागपूर येथे गुरुवारी (ता. 23) आगमन झालेल्या सोरेन यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. (Jharkhand At Last Stage Of Naxal Annihilation CM Hemant Soren Claim At Nagpur)

Jharkhand CM Hemant Soren With Congress President Mallikarjun kharge at Nagpur.
Naxal on Medigadda : मेडीगड्डावरून नक्षलवादीही ‘केसीआर’वर साधताहेत निशाणा

काही तासांपूर्वी झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील जंगल परिसरात माओवादीविरोधी कारवाई सुरू असताना ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ (IED) स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान जखमी झाला आहे. स्फोटाबाबत विचारले असता सोरेन म्हणाले, ‘सुरक्षा दलांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. झारखंडमध्ये माओवाद निर्मूलनाचे काम अंतिम टप्प्यात आहेत. त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. ,

देशाच्या सुरक्षेत केंद्रीय राखीव पोलिस दलाची भूमिका उत्कृष्ट असल्याचं सोरेन यांनी नमूद केलं. देशासाठी बलिदान देणाऱ्या सीआरपीएफ जवानांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की, प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (माओवादी) हेसाबंद गावाजवळील जंगलात आयईडी स्फोटके पेरली होती. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे विशेष कोब्रा युनिट, झारखंडचे जुग्गर पोलिस, जिल्हा सशस्त्र पोलिसांचे सुरक्षा दल या भागात माओवाद्यांविरोधातील मोहिमेवर होते. गस्त घालत असताना आयईडीचा स्फोट झाला. स्फोटात सीआरपीएफ 174 बटालियनचा जवान हफिजुर रहमान जखमी झाला. जवानावर रांची येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवानची प्रकृती स्थिर असल्याचं सोरेन म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या आठवड्यात गोईकेरा जंगलात झालेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता तर दोघे जखमी झाले होते. हुतात्मा झालेल्या जवानाला सोरेन यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशातील 10 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये सध्या माओवादी कारवाया सुरू आहेत. या सर्व राज्यांपुढं माओवाद्यांचा खात्मा करण्याचं आव्हान गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. यातील झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओदिशा हे सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. महाराष्ट्रातील गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्येही माओवाद्यांचा धुडगूस सुरू आहे. मात्र येथे महाराष्ट्र राज्य पोलिस त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.

Edited by : Atul Mehere

Jharkhand CM Hemant Soren With Congress President Mallikarjun kharge at Nagpur.
Gadchiroli News : तोडगट्टाजवळ आदिवासींनी पोलिसांना घेरलं, आठजण ताब्यात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com