Naxal on Medigadda : मेडीगड्डावरून नक्षलवादीही ‘केसीआर’वर साधताहेत निशाणा

Allegation on CM KCR : तेलंगण विधानसभा निवडणुकीतील राजकारण तापतेय महाराष्ट्रातून
Medigadd and Naxal
Medigadd and NaxalGoogle

Gadchiroli Political News : तेलंगणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केल्यानंतर या मुद्द्यावर महाराष्ट्र-तेलंगणात कार्यरत नक्षलवादी चळवळही आक्रमक झाली आहे. नक्षल्यांनीही मुख्यमंत्री केसीआर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणावरील पुलाचे तीन खांब अलीकडच्या काळात खचले. त्यावरून तेलंगणा विधानसभा निवडणूक रणधुमाळीत घमासान सुरू आहे. यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केसीआर यांच्यावर टीका केली आहे. आता नक्षलवादीही या मोहिमेसाठी पुढं सरसावलेत. (Pamphlets in Telugu language by Naxalites in Maharashtra & Telangana on the issue of Medigadda Dam in Gadchiroli in view of upcoming elections)

काँग्रेस व भाजप तेलंगणात केसीआर सरकारवर टीकेची झोड उठवत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातही या मुद्द्यावर जोरदार मोहीम सुरू आहे. याच विषयावर नक्षलवाद्यांनी तेलुगू भाषेत पत्रक काढत तेलंगणाचे मुख्यमंत्री

के. चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केलेत. मेडीगड्डाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला. हे धरण फुटलं आणि त्यात गडचिरोली वाहून गेलं, तर त्याला केसीआर जबाबदार असतील, असं नक्षल्यांनी पत्रकात नमूद केल आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचाजवळ मेडीगड्डा धरणावरील पुलाचे तीन खांब खचल्याचा प्रकार २१ ऑक्टोबरला रात्री घडला होता. त्यानंतर तातडीने तेलंगणा सरकारने महाराष्ट्राला जोडणाऱ्या एक किलोमीटरच्या पुलावरील वाहतूक बंद केली. येथे मोठा सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रसारमाध्यमांसह कुणालाही या भागात जाण्याची परवानगी देण्यात येत नव्हती. याचवेळी घटनेचा शोध घेण्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात आल्यानं महराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला. सिरोंचा तालुक्यातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांचे कृषिपंप, शेती साहित्य वाहून गेले. अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्यानं हजारो एकर शेती बुडाली. जनावरे वाहून गेली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणात या मुद्द्यावरून विरोधकांनी केसीआर यांना कोंडीत पडकलं तर महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी या मुद्द्यावर रान पेटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्रात भाजपचं सरकार असताना मेडीगड्डा प्रकल्पाची उभारणी व्यापक पद्धतीनं झाली. त्यामुळं या प्रकल्पावरून महाराष्ट्र भाजपवरही टीका होते आहे. परंतु तेलंगणात मेडीगड्डावरून भाजप केसीआर यांना कात्रीत पकडू पाहतंय. अशातच नक्षल्यांनी पत्रकबाजी सुरू केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी आणि आता नक्षल्यांनीही केसीआर सरकारवर प्रहार केला आहे. नक्षल्यांचं पत्रक महाराष्ट्र आणि तेलंगणातील सीमावर्ती भागातील सोशल माध्यमांवर चांगलंच व्हायरल झालं आहे. या पत्रकात नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्या कुटुंबीयांनी या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचा आरोप केला आहे. हाच मुद्दा कालांतराने महाराष्ट्रातही गाजवता येतो का, या प्रयत्नात सध्या नक्षली आहेत.

(Edited By : Prasannaa Jakate)

Medigadd and Naxal
Medigadda Dam : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरून राहुल गांधी बरसले, मेडीगड्डाला केसीआरचे एटीएम संबोधले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com