Buldhana Scam : शेळी, बोकड वाटपात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे हात ओले

Ravikant Tupkar : कोट्यवधी रुपयांचा घोळ झाल्याचा दावा
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Manav Vikas Mission : मानव विकास मिशनअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे 151 बचत गटांना शेळी व बोकड वाटप कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमात प्रचंड गैरव्यवहार केला जात असून लाभार्थ्यांना अत्यंत कमी वजनाच्या व दुर्बल शेळी, बोकड देऊन फसवणूक केली जात असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.

काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली व अधिकाऱ्यांच्या संगनमताने चार ते पाच कोटी रुपयांचा हा अपहार होत असल्याचा आरोप करीत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही तुपकर यांनी केली आहे. रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात बुलढाण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. तुपकर यांनी म्हटले आहे की, मानव विकास मिशनअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील एकूण 151 बचत गटांना अंदाजे 7 कोटी 61 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी संग्रामपूर, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा या सहा तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध झाला आहे.

Ravikant Tupkar
Raju Sheety : बुलढाण्यात येऊनही रविकांत तुपकरांना का टाळले? चर्चांना उधाण

उपलब्ध निधी शासनाच्या नियमानुसार मानव विकास मिशनअंतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झाला आहे. त्यांनी महिला बचत गटांसाठी शासन अधिकृत महामंडळ अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळ विभाग, पडेगांव येथे रितसर पत्रव्यवहार व कार्यवाही करुन शेळी व बोकड खरेदी करुन द्यायला हवी होती. परंतु तसे न करता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने हा निधी हा परस्पर लाभार्थ्यांच्या खात्यात वळता केला आहे.

उपलब्ध निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वळता केल्यानंतर लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार निधीमध्ये मंजूर प्रस्तावानुसार 30 शेळ्या प्रत्येकी 35 किलो व 3 बोकड प्रत्येकी 45 किलो असे एकूण 33 पशू त्यांच्या पसंतीने खुल्या बाजारातून खरेदी करणे अपेक्षित आहे. तीन वर्षांचा विमा व डॉक्टरांचे सोलनेस (फिटनेस) सर्टिफिकेट काढून ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल करण्याचीही तरतूद आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याउलट खातेदारांच्या खात्यात पैसे टाकल्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे व त्यांच्या काही अधिकाऱ्यांद्वारे प्रकल्प संचालक, उमेद जिल्हा मिशन मॅनेजर, ब्लॉक मॅनेजर यांनी बेकायदेशिररित्या ठेकेदार म्हणून पुरवठादाराची नेमणूक करण्याचा घोळ केला आहे. 12 हजार रुपये किमतीची एक शेळी व 14 हजार रुपये किंमतीचा एक बोकड अशी खरेदी किंमत असताना लाभार्थ्यांना ठेकेदाराकडून फक्त सहा हजार रुपये किमतीची शेळी व अत्यंत निकृष्ट दर्जाची देण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेले शेळी व बोकड आजारी व परप्रांतातील आहेत. अशी घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ गुरांच्या दवाखान्यात व वडाळी गावात लाभार्थ्यांसोबत घडल्याचा दावाही तुपकर यांनी केला आहे.

अशा स्थितीत लाभार्थ्यांनी पशुंचा ताबा घेण्यास नकार दिला. शासनाच्या ध्येय धोरणानुसार व मूल्यांकनानुसार वजनाने पशुंचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. हे शक्य नसल्यास खुल्या बाजारातून आपल्या पसंतीने पशु खरेदी करू व तसा अहवाल सादर करू, असे बचत गटांनी ब्लॉक मॅनेजर यांना सांगितले. परंतु ब्लॉक मॅनेजर यांनी त्यांची ही रास्त मागणी न ऐकता पुरवठादाराकडून पशुखरेदी करण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे. यासंर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Ravikant Tupkar
Protest For Farmer : कोर्टाने पोलिसांना पुन्हा फटकारले, रविकांत तुपकर यांना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com