Kiran Mane With Thackeray : शेंबडं पोरगं बी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना...

SindhKhed Raja : किरण मानेंचं गीत सोशल मीडियावर व्हायरल.
Kiran Mane
Kiran ManeSarkarnama
Published on
Updated on

Kiran Mane With Thackeray : शिवसेनेच्या ठाकरे गटात अभिनेते किरण माने यांनी नुकताच प्रवेश केला आहे. नेहमी चर्चेत राहणाऱ्या माने यांनी भर सभेत गायलेलं एक गीत सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. शिवसेना नेमकी कुणाची, असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या गीतातून केला आहे. "एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना आरं येडं पोरगं बी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना" हे गीत त्यांनी गायले आहे.

'बिग बॉस मराठी 4', 'मुलगी झाली हो', अशा लोकप्रिय मराठी शोसह 'टकाटक 2', 'रावरंभा', 'स्वराज्य' यांसह अनेक चित्रपटात भूमिका साकारणारे मराठी अभिनेता किरण माने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भूमिकांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. मराठा सर्वेक्षणाबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या पुष्कर जोगला माने यांनी 'मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल... मापात राहा..., अशा शब्दांत किरण माने इशारा दिला.

Kiran Mane
Akola Vanchit News : महाविकास आघाडीत येऊन 'वंचित'ला मिळणार का बालेकिल्ला?

यापूर्वी किरण माने यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार यावर भरपूर चर्चा झाल्या. अखेर त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन त्यांनी बांधले. त्यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आलं होतं. 'शिवसेना सर्वसामान्याची आहे. राजकारण गढूळ झालं असताना एकटा माणूस लढतोय. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून, माणूस म्हणून त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला'. असे माने म्हणाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान शिवसेना ठाकरे गटात येताच त्यांनी पक्षाची मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या 'लेक महाराष्ट्राची साद मातोश्रीची' या मोहिमेच्या उद्घाटनासाठी किरण माने नुकतेच सिंदखेडराजा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी एक भन्नाट गाणं गायलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान या गाण्याचा व्हिडिओ आपल्या सोशल माध्यमातून शेअर केला आहे. माने यांनी हे गाणं 'माझा’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान माझा मित्र विनायक पवार याचं हे भन्नाट गाणं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान अनेकांनी हे गीत डाऊनलोड करीत, तर कुणी शेयर करीत सोशल मिडियातून मोठ्या प्रमाणात शेयर केलं आहे. तर किरण माने यांचं हे गीत म्हणतानाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अनोख्या चालीत त्यांनी हे गीत भर सभेत गायलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे गीत आता नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com