Akola : चंद्र वाढतो कलेकलेने अन‌् हरीश वाढतो किलोकिलोने, असं का म्हणाले गडकरी

Highway Inauguration : अकोल्यातील मिश्किल टिप्पणीनं पिकली खसखस
Nitin Gadkari & Harish Pimple in Public Meeting at Akola.
Nitin Gadkari & Harish Pimple in Public Meeting at Akola.Google
Published on
Updated on

Nitin Gadkari : भव्यदिव्य उड्डाणपूल, प्रशस्त महामार्ग, भूयारी मार्गाच्या निर्माणांसाठी आता जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या दिलखुलास वत्कृत्व शैलीसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच दिलखुलास संवादानं अकोला जिल्ह्यातील एका समारंभात खसखस पिकली.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर जवळ आयोजित एका कार्यक्रमात गडकरींनी आपल्या भाषणादरम्यान तुफान बॅटिंग केली. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या मिश्किलपणाचा प्रत्यय सर्वांना आला. (Laughter Spread Out During Speech Of Central Minister Nitin Gadkari At Akola Commented on BJP MLA Harish Pimple)

Nitin Gadkari & Harish Pimple in Public Meeting at Akola.
Nitin Gadkari : देशभरातील नेते क्रिकेट पाहण्यात दंग असताना गडकरी होते खास मोहिमेवर

राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते कुरणखेड रस्त्याचं चौपदरीकरण, कुरणखेड ते शेळद प्रशस्त रस्त्याचं लोकार्पण आणि कारंजा, खेर्डा, मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 23) झालं. खासदार भावना गवळी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाऊ, भाजपचे किशोर मांगटे पाटील, अुनप धोत्रे, विजय अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आमदार पिंपळे यांनी नितीन गडकरी यांच्या कामाची तोंडभरून स्तुती केली. पिंपळे म्हणाले की, ‘गडकरी साहेब तुमच्याशिवाय आम्हाला कुणी वाली नाही. कारंजा मूर्तिजापूर रस्त्याची प्रचंड वाईट अवस्था होती. चंद्रावर आपण चंद्रयान पाठविल्यावर जसे खड्डे बघायला मिळाले, तसे खड्डे पडले होते. लोक मला या रस्त्यासाठी खुप शिव्या हासडायचे. माझं वजन शंभर किलो होतं. लोकांच्या शिव्यांमुळं ते काही कमी होत नव्हतं. आता रस्ता बनलाय तर लोकांच्या शिव्या कमी होती अन‌् माझ्या वजनावर थोडा तरी फरक पडेल.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार पिंपळे यांच्या या वाक्याच्या धागा पकडत नितीन गडकरी यांनीही मग मिश्किल टिप्पणी केली. ‘आज मला विशेष रूपाने आनंद आहे की, हरीश पिंपळे यांनी सांगितलं की कारंजापासून ते मूर्तिजापूरपर्यंत येणाऱ्या रस्त्यापर्यंत किती खड्डे होते. चंद्रयानामध्ये जसे खड्डे दिसेल तसे खड्डे लोकांनी पाहिले, असा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की लोकांच्या शिव्या खाऊ खाऊ माझं वजन कमी झालं. पण आता मला चिंता ही आहे की, आम्ही सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधणार आहे. त्यामुळं 50 वर्ष त्याच्यावर खड्डे पडणार नाही. रस्ता चांगला होईल. खड्डे पडणार नाही. मग हरीश पिंपळेचं वजन मात्र आता दीडशे किलो व्हायला नको. नाही तर चंद्र वाढतो कलेकलेनं आणि हरीश वाढतो किलोकिलोनं..’, असं त्यांनी म्हणता उपस्थित खळखळुन हसले.

2 हजार 378 कोटींच्या प्रकल्पात मूर्तिजापूर-कारंजा, अमरावती-कुरणखेड आणि कुरणखेड-चिखली या राष्ट्रीय महामार्ग चौपदरी आणि एकूण प्रकल्पाचा समावेश आहे. गडकरी यांनी आपल्या भाषणात शेगाव-देवरी फाटा मार्गावरील पूर्णा नदीवर मोठ्या पुलासाठी १०० कोटी, बार्शीटाकळी येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी १३० कोटी, अकोला-अकोट- गांधीग्राम रस्त्यावर पूर्णा नदीवर पुलासाठी ७० कोटी रुपयांच्या निधीचीही घोषणा केली. अकोट-अकोला रस्त्याचं कामही तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Edited by : Prasannaa Jakate

Nitin Gadkari & Harish Pimple in Public Meeting at Akola.
Akola Police : अवैध धंद्यांवरुन एकाच वेळी सत्ताधारी, विरोधी पक्षातील आमदारांचा ‘लेटरबॉम्ब’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com