Akola Police : अवैध धंद्यांवरुन एकाच वेळी सत्ताधारी, विरोधी पक्षातील आमदारांचा ‘लेटरबॉम्ब’

Serious Allegations : आमदार नितीन देशमुख, हरीश पिंपळे यांच्याकडून तक्रार
Nitin Deshmukh & Harish Pimple.
Nitin Deshmukh & Harish Pimple.Google
Published on
Updated on

BJP And Shiv Sena Uddhay Thackeray Group : अकोला शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आलाय. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून अभय मिळत असल्याची तक्रार एकाच वेळी दोन आमदारांनी केलीय. यातील एक आमदार सत्ताधारी आहेत, तर दुसरे विरोधी पक्षातील. दोन लोकप्रतिनिधींनी एकाचवेळी तक्रार केल्यानं अकोला पोलिस विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागलेय.

मूर्तिजापूर येथील भाजप आमदार हरीश पिंपळे आणि बाळापूर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी हा ‘लेटरबॉम्ब’ टाकलाय. (Letter Bomb By Shiv Sena Uddhav Thackeray Group MLA Nitin Deshmukh & BJP MLA Harish Pimple Over Ongoing Illegal Businesses In Akola)

Nitin Deshmukh & Harish Pimple.
Akola Maratha Reservation : दीडशे एकर जागेवर होणार जरांगे पाटलांची सभा

भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी तर थेट पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांवर आरोप केले आहेत. आमदार देशमुख यांनीही जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे तक्रार करीत जिल्ह्यातील अवैध धंदे सुरू असल्याकडं लक्ष वेधलय. आमदार पिंपळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार केली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे आहेत. मूर्तिजापूरचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे आहेत. त्यामुळं मूर्तिजापूर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टीने विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात यावी. या प्रकारात दोषी आढळल्यास पोलीस अधीक्षक व मूर्तिजापूरच्या ठाणेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

आमदार देशमुख यांनाही अकोल्यात घडलेल्या घटनांवरून प्रशासनाला लक्ष्य केलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून अकोला शहरात व जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये अवैध धंदे सुरू आहेत. यात जुगार, वरली, मटका, हातभट्टीची दारूचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यात झालेल्या दंगली व जातीय तणावाकडंही त्यांनी लक्ष वेधलय. काही कॅफेंमध्ये बेकायदेशीर कृत्य होत आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा ७ डिसेंबरपर्यंत बंदोबस्त न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मोर्चा काढेल, असा इशारा आमदार देशमुखांनी दिलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक वर्षातच अकोला शहरात एक मोठीय जातीय दंगल व जिल्ह्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध प्रकारांबाबत व समाजकंटकांबाबत नागरीक पोलिसांना प्रत्यक्ष किंवा फोनवरून माहिती देतात. परंतु बऱ्याच पोलिस ठाण्यातून तक्रारकर्त्यांची नावं गुन्हेगार व समाजकंटकांनी सांगण्यात येत असल्यानं पोलिस कुणाच्या बाजुनं आहेत, असा प्रश्न पडतो. अकोला शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही धिंगाणा झालाय. शहरातील पोलिस केवळ वाहनचालकांवर कारवाई व वसुली करण्यात व्यस्त असतात. ग्रामीण भागात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळं सामान्य नागरीकांचाही अकोला पोलिसांवर रोष आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Nitin Deshmukh & Harish Pimple.
Akola BJP : नेत्यांनी मागवली यादी कर्मचाऱ्यांची, बघणार कशी होत नाही स्वच्छता आता शहराची

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com