Sunil Kedar News : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुनील केदार काँग्रेसला भगदाड पाडूनच शांत बसणार? राजीनामे पदाधिकाऱ्यांच्या खिशात...

Sunil Kedar ticket controversy : तिकीट वाटप समन्वयाने आणि संमतीने व्हावे, याकरिता काँग्रेसने एक निवड समिती स्थापन केली होती. बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला निवड समितीचे प्रमुख नेमले होते.
Sunil Kedar Congress ticket controversy
Sunil Kedar Congress ticket controversySarkarnama
Published on
Updated on

Nagpur Congress internal conflict : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपालिकेत काँग्रेसचा एबी फॉर्म शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दिल्याने सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवले आहेत. याच प्रमाणे काटोल तालुक्यातील कोंढाळी पालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. या सर्वांचा राग काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर आहे.

केदार यांनी आपल्याच मनाने तिकिटांचे वाटप केले, प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले आणि भाजपला मदत होईल, असे उमेदवार दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. जिल्हाभरातून तक्रारी येत असल्याने केदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच सर्वांचे लक्ष केदार यांच्या भूमिकेकडे लागले होते.

तिकीट वाटप समन्वयाने आणि संमतीने व्हावे, याकरिता काँग्रेसने एक निवड समिती स्थापन केली होती. बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला निवड समितीचे प्रमुख नेमले होते. मात्र केदारांनी निवड समितीला गुंडाळून ठेवले. त्यांच्या अपरोक्ष इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता आपल्याच समर्थकांना बोलावले होते. यावर आक्षेप घेऊन तक्रारी झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी हा मुलाखती रद्द केल्या होत्या. नव्याने मुलाखती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुलाखती घेण्यात आल्या. मात्र या बैठकीला केदारांचे समर्थकांना दांडी मारली.

Sunil Kedar Congress ticket controversy
Maharashtra Government : मोठी बातमी : SC-ST समाजातील व्यक्तीचा अत्याचाराने मृत्यू झाल्यास वारसांना सरकारी नोकरी; कार्यपध्दती जाहीर...

दुसऱ्या दिवशी अहवाल आणि इच्छुकांच्या नावाची यादी सादर करण्यात आली. ती शेवटपर्यंत बाहेर आली नाही. केदारांनी जे ठरवले त्यानुसार कुठे आघाडी करण्यात आली तर कुठे स्वबळावर काँग्रेस लढत आहे. उमेदवारही केदारांनीच निश्चित केले. ज्या पालिका क्षेत्रात, तालुक्यात निवडणूक आहे तेथील कार्यकर्त्यांना विचारले नाही. त्यांचे मत घेतले नाही. त्यामुळे असंतोष उफाळून आला आहे.

Sunil Kedar Congress ticket controversy
Nitish Kumar News : नितीश कुमार दहाव्यांदा CM बनल्यानंतर बापलेकाची पहिली भेट; बिहारसह देशाचं मन जिंकलं... Video व्हायरल

वाडीच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. आता काटोल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. विशेष म्हणजे गुरुवारी हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्याकडे अद्याप कुणाचे राजीनामे आले नाहीत, असे सांगून केदारांची बाजू घेतली असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com