Latur Loksabha : लातूरच्या शृंगारेंची गाडी सुसाट; विद्यमान आमदारांना केले माजी, तर बावनकुळे यांचा उल्लेख बावनसुळे...

Sudhakar Shrungare Lok Sabha Candidate : गेल्या महिनाभरापासून लातूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्याबद्दल नकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.
sudhakar shrungare
sudhakar shrungareSarkarnama

Latur Lok Sabha News 2024 : महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी आज लातूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule व जिल्ह्यातील महायुतीचे आमदार, नेते, पदाधिकारी यांची या वेळी उपस्थिती होती. गेल्या महिनाभरापासून लातूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे Sudhakar Shrungare यांच्याबद्दल नकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.

याशिवाय त्यांची उमेदवारी बदलली जाणार अशा वावड्या मध्यंतरी उठवल्या गेल्या. मात्र, या सर्वांवर मात करत अखेर आज शृंगारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत या सगळ्या चर्चा आणि वावड्यांना पूर्णविराम दिला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या मेळाव्यात सुधाकर शृंगारे यांची गाडी अशी काही सुसाट सुटली की, त्याला ब्रेकच लागत नव्हता. भाषणाला सुरुवात करण्याआधी व्यासपीठावरील मान्यवरांचा नाम उल्लेख करताना शृंगारे यांची चांगलीच भांबेरी उडाली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख चक्क त्यांनी बावनसुळे असा केला, तर भाजपचे औशाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार Abhimanyu Pawar, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील, रमेश आप्पा कराड या सर्वांचा उल्लेख माजी आमदार म्हणून केला. बरं त्यांना व्यासपीठावरील नेते चुकीचा उल्लेख करत आहात हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शृंगारुंची बुलेट ट्रेन अशी काही निघाली होती की त्याला ब्रेकच लागला नाही.

sudhakar shrungare
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंच्या हाती रथाचे सारथ्य, घोड्यावरून...

घाईघाईत व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेऊन त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या भाषणापेक्षा प्रस्तावनेत त्यांनी केलेल्या चुकांचीच सभेच्या ठिकाणी अधिक चर्चा रंगली होती. लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच उलटसुलट चर्चा आणि भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली. दुसरीकडे महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे Shivaji kalge यांनी प्रचारात आघाडी घेत पहिला राउंड पूर्ण करत दुसऱ्या राउंडची तयारी केली.

मात्र, महायुतीच्या शृंगारे यांच्या प्रचाराला मात्र काही वेग आला नव्हता. आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्ह्यातील भाजपचे नेते व महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची साथ शृंगारे यांना मिळेल आणि ते प्रचारात आघाडी घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाजी काळगे यांच्यासाठी काँग्रेसचे आमदार अमित व धीरज देशमुख तसेच त्यांच्या मातोश्री वैशालीताई देशमुख Vaishali Deshmukh या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.

तर दुसरीकडे महायुतीचे शृंगारे यांना जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना एकत्र आणतानाच नाकीनऊ येताना दिसत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लातूरमध्ये आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश आप्पा कराड यांना हेवेदावे विसरून शृंगारे यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशी सक्त ताकीद दिल्याची चर्चा आहे.

R

sudhakar shrungare
Loksabha Election : 'भाजपने हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी घेतला', शिंदे गटातील नेत्याचे गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com